उसगाव ८४, पेल्हार ९३ तर सूर्या ७५ टक्के भरले
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरारला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली आहेत. पेल्हार, पापडखिंड आणि उसगाव तलाव भरून वाहू लागली आहेत तर सुर्या धरण ७५ टक्के भरले आहे. त्यामुळे वसईकरांची पाण्याची समस्या सुटली आहे.
- सध्या वसईसह पालघर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. पालघर जिल्ह्य़ात असलेल्या धरणश्रेत्रात पावसाची संततधार सुरू आहे.
- वसई-विरार शहराला पाणीपुरवाठा करणारी पेल्हार आणि उसगाव धरणे पूर्ण भरून वाहू लागली आहेत.
- गेल्या वर्षी याच दिवशी उसगाव धरण ८४ टक्के, तर पेल्हार धरण ९३% भरले होते.
- विरारचे पापडखिंड हे छोटे धरणही यापूर्वीच भरले आहे. या धरणातू विरारला एक दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.
- वसई-विरार शहराला सूर्या धरणातून १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. हे सगळ्यात मोठे धरण आहे. हे धरण ७५ टक्के भरले आहे.
- गेल्या वर्षी ते केवळ ५८ टक्के भरले होते. त्यामुळे वसई-विरार शहराला पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले.
- सूर्या टप्पा क्रमांक ३ चे काम प्रगतीपथावर असून त्यामुळे वसई-विरार शहराला आणखी १०० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे.
- याशिवाय वितरण योजना मंजूर झाली असून त्याद्वारे जलकुंभ आणि नवीन जलवाहिन्या टाकल्या जाणार आहे.