पाच दिवसाच्या बाळाला इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून फेकून दिल्याने चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी रामनगर पोलिसांनी अनोळखी व्यक्ति विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी महिला राहत असलेल्या अंबरनाथ येथे जाऊन नातेवाईकांची चौकशी केली. सुजाताचे नातेवाईक संतोष गवळी यांनी गुन्हा दाखल केला आहे. डोंबिवलीतील शुभदा नर्सिग होममध्ये अंबरनाथ जवळील नाऱ्हेन गावातील सुजाता गायकवाड ही महिला रविवारी प्रसूत झाली होती. गुरूवारी तिला रूग्णालयातून सोडण्यात येणार होते. दरम्यानच्या काळात बाळाची आई सुजाताला बाळ हरवले असल्याचे लक्षात आले. शोध सुरू केला असता, रूग्णालयाच्या तळ मजल्याला मृत अवस्थेत बाळ आढळून आले होते.