पाण्याचा विसर्ग सुरू; सूर्या नदीला पूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कासा : जिल्ह्य़ात संततधार पावसामुळे कासाजवळील धामणी धरण १०० टक्के भरल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. धामणी धरणाचे सर्व पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सूर्या नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्य़ातील डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा सूर्या प्रकल्पातील धरणातून केला जातो. धामणी धरणाची पाण्याची पातळी ११८.६० मीटर इतकी आहे. धरणातील पाणीसाठा २८५.३१० दशलक्ष घनमीटर इतका आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhamni dam overflow zws
First published on: 01-09-2020 at 03:55 IST