येत्या तीन-चार दिवसात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. ठाकुर्ली जवळील खंबाळपाडा, भोईरवाडी भागात राहत असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना घरापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत मोफत रिक्षा वाहतूक सेवा देण्याचा निर्णय लाल बावटा रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परीक्षेच्या काळात विद्यार्थी, पालक तणावामध्ये असतात. काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते परीक्षा केंद्रापर्यंत रिक्षेने जाऊ शकत नाहीत. ही तणावाची परिस्थिती विचारात घेऊन लाल बावटा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी आपल्या रिक्षा संघटनेच्या सर्व सदस्यांना परीक्षा काळात विद्यार्थी पालकांना भाडे आकारू नका. विद्यार्थ्यांच्या जवळ भाड्यासाठी पैसे नसतील तर अशा विद्यार्थ्यांना प्रवासासाठी नकार देऊ नका. त्या विद्यार्थ्याचा पत्ता किंवा मोबाईल क्रमांक जवळ घेऊन ठेवा. त्या विद्यार्थ्याला रिक्षाचालकाने मोफत सेवा दिली असेल तर त्या विद्यार्थ्यांचे भाडे लालबावटा युनियनच्या कार्यालयातून संबधित रिक्षाचालकाला देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील पुरावा दाखविल्यावर पैसे देण्यात येणार आहे, असे अध्यक्ष कोमास्कर यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivali free service to examination center by rickshaw union for students asj
First published on: 03-03-2022 at 13:06 IST