डोंबिवली: मागील १० वर्षानंतर प्रथमच डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्ते, पदपथ फेरीवाला मुक्त, मोकळे दिसत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका पासून १५० मीटरच्या आत एकही फेरीवाला दिसणार नाही, असे नियोजन ग आणि फ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात धोकादायक वृक्षांचे पुन्हा होणार सर्वेक्षण?; धोकादायक वृक्षांच्या शोधासाठी ‘या’ नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा पालिकेचा विचार

kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Dombivli railway station, roof platform Dombivli,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके
sangli ganja seized marathi news
सांगली : मिरजेत अडीच लाखाचा गांजा, नशेच्या गोळ्या जप्त

फ आणि ग प्रभागातील कर्मचारी सकाळी आठ ते रात्री १० वाजेपर्यंत रेल्वे स्थानक भागातील नेहरु रस्ता, फडके रस्ता, चिमणीगल्ली, बाजीप्रभू चौक, रेल्वे स्थानक डाॅ. राॅथ रस्ता, राजाजी रस्ता, रामनगर रेल्वे तिकीट खिडकी, उर्सेकर वाडी भागात गस्त घालतात. या सततच्या गस्तीमुळे कारवाई टाळण्यासाठी एकही फेरीवाला रेल्वे स्थानक भागात दुकान लावून बसत नाही. सकाळ, संध्याकाळ कामावर जाणारे आणि परतणारे प्रवासी रस्ते, पदपथ मोकळे असल्याने समाधान व्यक्त करत आहेत.

हेही वाचा >>> दीपोत्सवानिमित्त डोंबिवलीत एक हजार लीटर खाद्यतेल जमा करण्याचा संकल्प

रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसणार नाही असे आदेश आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी १० प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. डोंबिवली पूर्व भागात सुमारे ९०० हून अधिक फेरीवाले असल्याने आणि सर्वाधिक वर्दळीचा भाग हा असल्याने आयुक्तांनी पूर्व भागावर सर्वाधिक लक्ष्य केंद्रित केले आहे. फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे, पथक प्रमुख मुरारी जोशी, ग प्रभागाचे साहाय्यक संजय साबळे, पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे आपल्या कारवाई पथकापासून सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत फेरीवाल्यांवर लक्ष्य ठेऊन आहेत. नजरचुकीने कोणी फेरीवाला इमारतीचा आडोसा घेऊन व्यवसाय करत असेल तर त्याचे साहित्य जप्त केले जात आहे. त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. हातगाडी असेल तर तिचा जागीच जेसीबाच्या साह्याने चुराडा केला जातो. रस्ते अडवून बसणारे भाजीपाला, फळ विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले जात आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली : २० हून अधिक रिक्षा चालकांना दंड, जप्तीची कारवाई

भेळ, पाणी पुरी विक्रेत्यांना रेल्वे स्थानपासून १५० मीटरच्या पुढे व्यवसाय करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दहा वर्षापूर्वी डोंबिवली,कल्याण मधील फेरीवाल्यांवरुन वातावरण तापले होते. त्यावेळी माजी आयुक्त रामनाथ सोनवणे होते. तत्कालीन नगरसेवकांनी प्रशासनावर फेरीवाल्यांच्या विषयावरुन महासभेत गंभीर आरोप केले होते. यावेळी आयुक्त सोनावणे यांनी सर्व फेरीवाला हटवा पथकांना तत्परतेने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. या कारवाईच्या भीतीने सलग तीन वर्ष डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात एकही फेरीवाला पालिका कर्मचाऱ्यांनी बसून दिला नव्हता. याच कालावधीत डोंबिवली पश्चिमेतील दांणगट फेरीवाले हटविण्यात पालिका, पोलिसांना यश आले होते. फेरीवाल्यांवर कारवाईची ही मोहीम अशीच पुढे सुरू राहणार आहे, असे फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त वाघचौरे, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त साबळे यांनी सांगितले.