कल्याण-डोंबिवली पालिकेचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लीलाधर म्हस्के यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांची तात्पुरती नेमणूक करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील दारिद्रय़ रेषेखालील रुग्णांना डायलेसीस, एमआरआय, सीटीस्कॅन या तपासण्यांसाठी पालिकेकडून अर्थ साहाय्य देण्याचा प्रस्ताव महापौर कल्याणी पाटील यांनी सर्वसाधारण सभेत ठेवला होता. या विषयावर चर्चा करताना मनसेच्या नगरसेविका वैशाली दरेकर-राणे यांनी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डायलेसीस केंद्र सुरू आहे का, असा सवाल केला. हे केंद्र सुरू करण्यासाठी डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी विकास निधी उपलब्ध करून दिला होता. त्याचे काय झाले, असा सवालही त्यांनी केला. तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. म्हस्के यांनी माहिती देण्याची मागणी केली.
म्हस्के गैरहजर असल्याने डॉ. कदम यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये नगरसेवकांचे समाधान झाले नाही. म्हस्के सभागृहात बोलवा ही सदस्यांची मागणी कायम राहिली. यावेळी सभागृहात उशिराने पोहचलेल्या डॉ. म्हस्के यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात आतापर्यंत डायलिस केंद्र सुरू नाही, अशी माहिती दिली. यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी म्हस्के यांना धारेवर धरले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी पद सांभाळण्याची मानसिकता म्हस्के यांच्याकडे नाही, अशी टीकाही यावेळी करण्यात आली. त्यामुळे म्हस्के यांना मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावरून दूर करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2015 रोजी प्रकाशित
डॉ. लीलाधर म्हस्के यांची उचलबांगडी
कल्याण-डोंबिवली पालिकेचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लीलाधर म्हस्के यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
First published on: 13-03-2015 at 08:46 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr liladhar mhaske