ठाणे : उत्तरप्रदेशातील वाराणसीमध्ये मेफेड्राॅन (एमडी) क्रिस्टल पावडर हा अमली पदार्थ तयार करणारा कारखाना ठाणे पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. ठाणे गुन्हे अन्वेशन शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मजूर बनून या कारखान्याची रेकी केली होती. वास्तव्यासाठी त्यांनी एक खोली देखील भाड्याने घेतली होती. गावकऱ्यांना संशय येऊ नये म्हणून हिंदीमध्ये संभाषण सुरू ठेवले होते. अमली पदार्थाचा कारखाना उद्ध्वस्त झाल्याने ठाणे पोलिसांचे कौतुक होत आहे.

पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. आफताब मलाडा (२२), जयनाथ यादव (२७), शेरबहादूर सिंग (२३), हुसेन सैय्यद (४८), अतुल सिंह (३६) आणि संतोष गुप्ता (३८) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, अमली पदार्थ बनविणाऱ्या म्होरक्याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी २७ कोटी ८७ लाख १७ हजार ९०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

forest fire
उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग; लष्कर, हवाई दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न
22 high tide days during monsoon
यंदा समुद्राला पावसाळ्यात २२ दिवस मोठी भरती…२०,२१ सप्टेबरला जुलैला सर्वात मोठी उधाणे, सुमारे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार
Buldhana, Police Seize 4 Pistols, Live Cartridges, Buldhana Madhya Pradesh Border, Buldhana Madhya Pradesh Border Operation, police operation, pistols seize in buldhana, buldhana crime news, crime news, buldhana news, lok sabha 2024,
बुलढाणा : चार पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात कारवाई
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी

हेही वाचा – विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या दबावापुढे न झुकण्याची भाजपची भूमिका

घोडबंदर येथील कासारवडवली भागात २४ जानेवारीला काहीजण अमली पदार्थ विक्रीसाठी आल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकला मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी कारवाई करून आफताब, जयनाथ, शेरबहादूर आणि हुसेन यांना अटक केली होती. पोलिसांना त्यांच्याकडे १४ लाख ५ हजार रुपये किमतीचे एमडी क्रिस्टल पावडर आढळून आली. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी हा एमडी उत्तरप्रदेशमधून आणल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी आणखी माहिती घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी वाराणसी येथील भगवतीपुर गावात एमडी क्रिस्टल पावडर तयार करण्याचा कारखानाच सुरू असल्याची माहिती युनीट एकला मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी उत्तरप्रदेश पोलिसांना संपर्क साधला. कारवाईसाठी पोलिसांनी त्यांना गावामध्ये एक खोली भाड्याने घेण्याची सूचना केली. उत्तरप्रदेश पोलिसांनी खबऱ्यामार्फत एक खोली गावात भाड्याने घेतली. त्यानंतर साहाय्क पोलीस निरीक्षक रूपाली पोळ, पोलीस नाईक विजय यादव तसेच युनीट एकच्या पथकाने दीड महिने या गावात रेकी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर शनिवारी दिलीप पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली पोळ, साहाय्यक उपनिरीक्षक रविंद्र पाटील, पोलीस हवालदार अमोल देसाई, प्रशांत निकुंभ आणि पोलीस नाईक विजय यादव यांच्या पथकाने कारखान्यावर छापा टाकला.

हेही वाचा – गणपत गायकवाडांच्या नाराजीमुळे खासदार श्रीकांत शिंदे सावध, कल्याण पूर्वमध्ये विकासकामांचा धडाका

या कारवाईत पोलिसांनी अतुल आणि संतोष या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या कारखान्यातून २ हजार ६४५ किलो ग्रॅम वजनाचा २ कोटी ६४ लाख ५० हजार रुपयांचा एमडी क्रिस्टल पावडर जप्त केली. तसेच मेफेड्राॅन, मेथेलामीन, क्लोरिफाॅर्म, हायड्रोक्लोरिक ॲसिड असे अनेक रसायने जप्त केली. या मिश्रणातून २५ कोटी रुपयांची एमडी क्रिस्टल पावडर तयार होते असे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ओम गुप्ता हा फरार आहे. अमली पदार्थ तयार करण्याची त्याला पद्धत माहिती आहे. तो अतुल आणि संतोष या दोघांना माहिती देत असल्याचे समोर आले आहे.

या कारवाईत रुपाली पोळ आणि विजय यादव या दोघांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दोघेही याठिकाणी मजूर म्हणून काम करत असे. संशय येऊ नये म्हणून रुपाली या साधी साडी नेसत होत्या. तर विजय हे धोतर, साधे शर्ट, डोक्याला मफलर गुंडाळत असे. परिसरात वावरत असताना ते हिंदी भाषेतून संभाषण करत होते. तसेच रात्रीच्या वेळेत कारखान्यात कोण येते जात असतो याची रेकी करत होते.