विरार :  तुळींज पोलीस ठाण्यात एका इस्टेट एजंटाचा पोलीस कर्मचाऱ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करणे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांना भोवले आहे. मीरा भाईंदर वसई विरारचे आयुक्त सदानंद दाते यांनी दत्तात्रय पाटील यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर ज्या इस्टेट एजंटचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्या सचिन गालाविरोधात कुठे गुन्हा दाखल आहे का? याची चौकशीही सहाय्यक पोलीस आयुक्त आयुक्त संजयकुमार पाटील यांनी सुरु केली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉटेल आणि इस्टेट एजंट असणारा सचिन गाला याचा वाढदिवस होऊन गेला होता. तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील हे करोनाशी झुंज देऊन पुन्हा कामावर रुजू झाले होते. त्याच दिवशी सचिन याने केक आणून पोलीस ठाण्यात कापला. याचा व्हिडीओ सचिन यानेच व्हायरल केला त्यानंतर मीरा भाईंदर वसई विरारचे आयुक्त सदानंद दाते यांनी पाटील यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.दरम्यान सचिन गाला याने माझ्यावर साधी एनसीही नाही असे सांगितले आहे. मात्र पोलीस गाला याच्यावर कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का याचा शोध घेत आहेत. दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त संजयकुमार पाटील यांनी २ दिवसात चौकशी अहवाल आल्या नंतर दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असे सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Easte agents birthday celebrate in tulinj police station inquiry order issued by the divisional commissioner scj
First published on: 14-10-2020 at 21:32 IST