पूर्वा साडविलकर- भालेकर, लोकसत्ता

ठाणे- करोना काळानंतर कंदिलांची बाजारपेठही आता कात टाकू लागली असून एकेकाळी चिनी कंदिलांनी फूलुन जाणाऱ्या मुंबई महानगर पट्टयातील बाजारपेठा पुन्हा एकदा पर्यावरणपुरक भारतीय बनावटींच्या कंदिलांनी सजल्याचे चित्र यंदा ठसठशीतपणे दिसू लागले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीनिमीत्त बाजारात विकण्यासाठी उपलब्ध असलेल्या भारतीय बनावटीच्या कंदीलांमध्ये वैविध्य पाहायला मिळत आहे. कागद, कापड, पुठ्ठा, जूट कागद आणि बांबू पासून तयार केलेले हे पारंपारिक पर्यावरणपुरक कंदील ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत. आकर्षक नक्षीकामासह मटका, सिलेंडर, झुंबर, पणती आणि चार ते बारा कोन असे विविध प्रकार या कंदिलांमध्ये उपलब्ध असून ग्राहकांचा कलही या कंदिलांच्या खरेदीकडे दिसू लागला आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा

दिवाळीनिमीत्त ठाणे, मुंबई तसेच उपनगरातील बाजारपेठा सजल्या आहेत. कंदील, पणत्या, रांगोळ्या, फटाके असे दिवाळीचे विविध साहित्य बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे. दिवाळी सणानिमित्त पूर्वी बाजारात मोठ्याप्रमाणात चिनी बनावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल होत होते. यामध्ये प्लास्टिकचा वापर करुन तयार करण्यात येणाऱ्या कंदीलांचा समावेश असायचा. हे कंदील दिसण्यास आकर्षक आणि स्वस्त दरात उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकांकडून मोठी मागणी होती. करोना काळानंतर हे चित्र आता बदलू लागले आहे. गेले दोन ते तीन वर्षांपासून चिनी बनावटीचे कंदील बाजारात दाखल होण्याचे प्रमाण घटले असून त्याच्या मागणीतही घट होत आहे, अशी माहिती ठाण्यातील कंदिल विक्रेते नरहरी सावंत यांनी दिली. यंदाच्या वर्षी भारतीय बनावटीच्या पारंपारिक कंदीलांमध्ये सध्या वैविध्य आल्याचे पहायला मिळत आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

आणखी वाचा-ठाणे: किरकोळ वादातून एकाची हत्या

पर्यावरणपूरक कंदीलांना मागणी

ठाणे, मुंबई तसेच उपनगरातील बाजारात पारंपारिक आणि पर्यावरणपूरक असे आकर्षित कंदील दाखल झाले आहेत. या कंदीलांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत असल्याची माहिती ठाण्यातील कंदील विक्रेते कैलाश देसले यांनी दिली. कापड, पुठ्ठा, कागद, जुट कागद, चटई आणि बांबू पासून हे कंदील तयार करण्यात आले आहेत. आकर्षक नक्षीकामासह मटका, सिलेंडर, झुंबर, पणती आणि चार ते बारा कोनाचे अशा विविध प्रकार या कंदीलांमध्ये पाहायला मिळत आहेत. छोट्या आणि मोठ्या अशा दोन्ही आकारात हे कंदील उपलब्ध आहेत. छोट्या कंदीलाची विक्री २० ते ४० रुपयांपर्यंत होत आहे. तर, मोठ्या आकाराचे कंदील १०० रुपयांपासून ६०० रुपयांपुढे विक्री होत आहे, असेही देसले यांनी सांगितले.

दरात वाढ

यंदा कंदील सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात वाढ झाली असून यामुळे कंदीलचे दर वाढले आहेत. मागील वर्षी १० रुपये प्रति नग विक्री करण्यात येणारा लहान कंदील यावर्षी २० रुपये प्रति नग विक्री करण्यात येत आहे. तर, ५८० रुपये प्रति नग विक्री करण्यात येणारा मोठ्या आकाराचा कंदील यंदा ६४० रुपये प्रति नग विक्री केला जात आहे, अशी माहिती ठाण्यातील कंदील विक्रेते मधुसूदन डोईफोडे यांनी दिली.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यातील पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; पालिका प्रशासनाकडून सानुग्रह अनुदान जाहीर

विठ्ठल-रखुमाई, श्रीस्वामी समर्थ, वारली कला साकारलेल्या कंदीलांना पसंती

गणेशोत्सवात विठ्ठल-रखुमाई आणि श्रीस्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे मखर बाजारात पाहण्यास मिळाले होते. या मखरांना ग्राहकांकडून मोठी मागणी होती. यावरुन आता, बाजारात दिवळी निमित्त विठ्ठल-रखुमाई, श्री स्वामी समर्थ यांची छायाचित्र असलेल्या कंदीलांना ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे. तसेच कमळ आकाराचा आणि वारली कला साकारलेल्या कंदीलांनाही ग्राहकांची मागणी आहे.