छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे शत्रू होते का, या परिसंवाद कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी सायंकाळी ठाण्यातील राष्ट्रवादीतर्फे मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र, जमावबंदीचा आदेश असतानाही मूक मोर्चा काढून त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड आणि सात नगरसेवकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे येथील गडकरी रंगायतन परिसरात शनिवारी आमदार आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मूक मोर्चामध्ये १०० ते १५० कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘कॉ. पानसरे अमर रहे’च्या घोषणाही या वेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. पानसरे यांच्या हत्येचा आणि परिसंवादाला परवानगी नाकारल्यामुळे तोंडाला काळ्या पट्टय़ा लावून कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Feb 2015 रोजी प्रकाशित
आव्हाडांसह आठ जणांविरोधात गुन्हा
छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे शत्रू होते का, या परिसंवाद कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध...

First published on: 23-02-2015 at 02:48 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight including jitendra awhad booked for rally