ठाणे येथील टेंभीनाका भागात रविवारी सकाळी ध्वनिप्रदूषणामुळे संतप्त झालेल्या विक्रांत वाड या अभियंत्याने प्रार्थनास्थळात घुसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी विक्रांतला ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील टेंभीनाका भागात एका विशिष्ट समाजामार्फत रविवारी सकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीसाठी पोलिसांनीही परवानगी दिली होती. ही मिरवणूक प्रार्थनास्थळ परिसरात येताच ध्वनिप्रदूषणामुळे विक्रांत त्रस्त झाला. याप्रकरणी त्याने ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, मात्र कार्यक्रमास परवानगी असल्याने त्याची समजूत काढण्यात आली. त्यानंतर विक्रांतने प्रार्थनास्थळात घुसून चाकूचा धाक दाखवत संबंधितांना ठार मारण्याची धमकी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2015 रोजी प्रकाशित
अभियंत्यास अटक
ठाणे येथील टेंभीनाका भागात रविवारी सकाळी ध्वनिप्रदूषणामुळे संतप्त झालेल्या विक्रांत वाड या अभियंत्याने प्रार्थनास्थळात घुसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी विक्रांतला ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे.
First published on: 16-03-2015 at 03:34 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineer arrested