उत्तम ते खावे आणि दुसऱ्यांनाही खिलवावे असे म्हणतात. छान मूड असेल, जिवाभावाचे मित्र जमले असतील तर पावभाजीचा बेत केला जातो. पावभाजी मूळची मुंबईची. मात्र आता ती राज्यभर लोकप्रिय आहे. बनवायला अतिशय सोपी, चवीला रुचकर अशी पावभाजी कुठेही, कधीही खाता येते. पार्सल म्हणूनही पावभाजी मोठय़ा प्रमाणात घरात आणून खाल्ली जाते. ठाणे पूर्व विभागातील ‘शिवम पार्सल’मध्ये चविष्ट पावभाजीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्याचबरोबर येथे पिझ्झा, सॅण्डविच, तवा पुलाव, विविध ज्युस आदी पदार्थही उपलब्ध आहेत.

मलई सॅण्डविच म्हटले की बंगाली गोड पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतो. मात्र ‘शिवम’मधील हे मलई सॅण्डविच वेगळे आहे. मऊ पाव त्यावर पसरवलेली दुधावरची साय. त्यामध्ये साखर, काकडी, टोमॅटो आदी पदार्थानी बनवलेले लुसलुशीत मलई सॅण्डविच खूप भारी लागते. मलई सॅण्डविच तोंडात टाकल्यावर चावायचीही गरज लागत नाही. ते जिभेवरून सहज विरघळते. त्याची चव मात्र बराच काळ जिभेवर रेंगाळत राहते. ‘शिवम’मधील पनीर सॅण्डविचही मस्तच आहे. ताजे, लुसलुसीत पनीर, काकडी, टोमॅटो, बीट आदी जिन्नस घालून बनवेलेले हे सॅण्डविच एक खाऊन समाधान होत नाही. त्यामुळे खवय्ये वनमोअर घेतात.

4 thousand power thefts in Nagpur circle know what is the status of Minister Devendra Fadnavis city
नागपूर परिमंडळात चार हजारावर वीजचोऱ्या; ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शहरात काय आहे स्थिती माहितीये…?
palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
houses, MHADA, Goregaon, houses Goregaon,
पंचतारांकित इमारतीमधील घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत, गोरेगावमध्ये मध्यम आणि उच्च गटासाठी म्हाडाची ३३२ घरे

पावभाजीमध्येही खडा पावभाजी, पनीर पावभाजी आदी प्रकार उपलब्ध आहे. खडा पावभाजीमध्ये भाज्यांचे तुकडे ठेवून त्यात पाव टाकले जातात. ही पावभाजी जरा सुकी असल्याने खाताना हात खराब होत नाहीत. पावभाजी मसाला, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आदी जिन्नस वापरून ही पावभाजी तयार केली जाते. त्यामुळे महिन्याला १५ किलो मसाले लागत असल्याची माहिती चेतन धुरी यांनी दिली. ८०० किलो बटाटे महिन्याला लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. पनीर पावभाजीमध्ये ताजे पनीर टाकले जाते. पनीर टाकताना ते अधिक बारीक करून टाकले जात नाही. शिवम स्पेशल पावभाजीमध्ये काजू, बदाम आदी ड्रायफ्रुट्स टाकले जातात. पनीर तसेच चीजही यामध्ये भरपूर प्रमाणात टाकले जाते.

पिझ्झामध्येही पनीर पिझ्झा, चीज पिझ्झा आदी प्रकार उपलब्ध आहेत. मात्र यामध्ये पायनापल पिझ्झा हा पदार्थ विशेष चविष्ट आहे. यामध्ये ताज्या अननसाचे तुकडे टाकले जातात. शिवाय चीज हवे असल्यास तेही टाकून मिळते. येथे बसायला जागा नसल्याने उभे राहून खावे लागते. त्यामुळे अनेक जण येथून पार्सल घरी नेणे पसंत करतात.

दाक्षिणात्य पदार्थाची तर आपल्याकडे चलतीच असते. हलके असणारे हे पदार्थ पचायलाही सोपेअसतात. त्यामुळे संध्याकाळी हे पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले जातात. दाक्षिणात्य पदार्थामध्ये मोठय़ा प्रमाणात मसाला डोसा खाल्ला जातो. मसाला डोशाचे अनेक प्रकार आता उपलब्ध आहेत. त्यामध्ये बटाटय़ाच्या भाजीबरोबरच पनीर, चीज आणि इतर पदार्थही टाकले जातात. त्याचप्रमाणे ‘शिवम’मध्येही अनेक प्रकारचे डोसे मिळतात. त्यात स्प्रिंग डोसा अधिक प्रमाणात खाल्ला जात असल्याचे त्यांनी सांगितले. न्युडल्स, कोबी, शेजवान चटणी आदी जिन्नस टाकून हा स्प्रिंग डोसा बनविला जातो. येथील तवा पुलावही पार्सल म्हणून नेला जातो. यामध्ये पनीर, चीज ,भाज्यांचा तवा पुलाव मिळतो. गरम गरम इडली आणि चटणी या पदार्थालाही अधिक मागणी आहे. याशिवाय उत्तर भारतीय पदार्थापैकी पाणीपुरी, शेवपुरी, भेळपुरी आदी पदार्थही मिळतात. त्यामुळे सर्व पदार्थाचे फ्यूजन येथे मिळतात. येथे साधारण ३० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत पदार्थ मिळतात. मोसंबी, अननस, संत्री आदी ताज्या फळांचा रस येथे मिळतोच, या व्यतिरिक्त येथील चॉकलेट मिल्कशेक पिताना ‘वा काय मस्त आहे’ अशी दाद उत्स्फूर्तपणे दिली जाते. जाड आणि ताज्या दुधातून बनविलेले हे चॉकलेट मिल्कशेक सर्वाच्याच पसंतीला उतरते. या दुकानातील मसाले खास बनवून घेतले जातात. त्यामुळे ते पोटाला बाधत नाहीत.

शिवम पार्सल

कुठे-  ठाणे रेल्वे स्थानकासमोर, ठाणे (पू.)

कधी- सकाळी ८ ते रात्री ९ वाजता.