लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : अचानक कोसळलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे भाईंदर पश्चिम येथील झोपडपट्टी भागात विद्युत मीटरने पेट घेऊन आग लागल्याची घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा पोहचलेली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे

Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात

भाईंदर पश्चिम येथे गणेश देवल नगर हा दाट लोकवस्ती असलेला झोपडपट्टी बहुल परिसर आहे. या भागातील शिवसेना गल्ली क्रमांक ४ येथे रविवारी सायंकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग प्रामुख्याने सायंकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने लागली असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये समूहाने असलेल्या जळवपास दहा ते बारा विद्युत मीटरने पेट घेतला आहे.

आणखी वाचा-ठाणे : शरद पवार यांचा राबोडीत फेरा

स्थानिक रहिवाशांच्या सतर्कतेमुळे येथील संपूर्ण झोपडपट्टी मोकळी करण्यात आली आहे.तर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवण्यात आले आहे. त्यानुसार नुकत्याच अग्निशमन गाड्या घटना स्थळी पोहचल्या असून तेथील विद्युत प्रवाह बंद करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली आहे.