प्राप्तिकर खात्याचे अधिकारी असल्याचे सांगून दोघा भामटय़ांनी एका तरुणाला साडेसात लाख रुपयांना लुबाडल्याची घटना बुधवारी ठाण्यातील परबवाडी येथे घडली.
आदित्य सावंत (२४) हा बुधवारी स्टॅण्डर्ट चार्टर्ड बँक एटीएम सेंटर समोरून जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्याला आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे लोक आहोत. तुमची चौकशी करायची आहे, असे सांगून बाजूच्या इनोव्हा कारमधून घोडबंदर रोडवरून गायमुख येथे नेले. तेथून त्याच्याकडील साडेसात लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्याच्या कारणावरून काढून घेण्यात आली. त्यानंतर या दोघांनी घोडबंदर रोडवरून रिक्षा करून आदित्यला आपल्यासोबत बसवले. मात्र, काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याला बळजबरीने खाली उतरवण्यात आले व या भामटय़ांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2015 रोजी प्रकाशित
प्राप्तिकर अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक
प्राप्तिकर खात्याचे अधिकारी असल्याचे सांगून दोघा भामटय़ांनी एका तरुणाला साडेसात लाख रुपयांना लुबाडल्याची घटना बुधवारी ठाण्यातील परबवाडी येथे घडली.
First published on: 28-05-2015 at 12:49 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forgery of a fake income tax officer