कल्याण – टिटवाळा ते दुर्गाडी किल्ला वळण रस्त्याच्या मार्गात आधारवाडी कचराभूमीच्या काही भागाचा अडसर होता. कचराभूमीवरील तीस टक्के कचरा हटविल्याशिवाय वळण रस्त्याचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण होणार नव्हता. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी तातडीने आधारवाडी कचराभूमीवरील वळण रस्ते मार्गातील ढीग हटविण्याचे आदेश दिल्याने हा ढीग हटविण्याचे बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे.

टिटवाळा ते गांधारे, वाडेघर या सातव्या ते चौथ्या टप्प्यातील वळण रस्ते मार्गातील बहुतांशी रस्ते कामे पूर्ण झाली आहेत. ४५ मीटर रूंदीच्या या रस्ते मार्गात आधारवाडी कचराभूमीचा सुमारे दोनशे मीटरचा पट्टा येत होता. मागील तीन वर्षापासून आधारवाडी कचराभूमी बंद करून वळण रस्त्याचा मार्ग मोकळा करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होत्या. या कामात अनेक अडथळे येत होते.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

हेही वाचा – तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरले; तरुणाने पत्नीसह केली दोन मुलांची हत्या

कचराभूमीच्या जागेतील वळण रस्त्यामुळे टिटवाळाकडून येणारा वळण रस्ता डोंबिवली मोठागाव वळण रस्त्याला जोडणे शक्य होणार आहे.
आयुक्त जाखड यांनी वळण रस्ता पूर्ण करण्याचा निर्धार करून या कामाकडे लक्ष दिले आहे. या कामाचा आढावा घेताना जाखड यांना आधारवाडी कचराभूमी येथे या रस्तेमार्गाला कचऱ्याचा अडथळा येत असल्याचे निदर्शनास आले. आयुक्तांनी तातडीने आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करून, या कचराभूमीवर कचरा न टाकण्याचे आदेश देऊन, परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होणार नाही अशा उपाययोजना करून वळण रस्ते मार्गातील ढीग हटविण्याचे आदेश घनकचरा अधिकाऱ्यांना दिले. त्याप्रमाणे बुधवारपासून हे काम सुरू करण्यात आले.

हेही वाचा – कल्याण तालुक्यातील पटसंख्ये अभावी शाळा बंद केलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेला राम राम, पर्यायी व्यवस्था केली जात नसल्याने पालक संतप्त

कचराभूमीवर कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याची योग्यरितीने विल्हेवाट लावली जाणार आहे. नेकाॅफ इंडिया कंपनी हे काम करणार आहे.
स्वच्छ भारत अभियानातील ४२ कोटीचा निधी या कामासाठी वापरण्यात येणार आहे. कचराभूमीवरील कचऱ्यापासून खत तयार केले जाणार आहे. कचऱ्यातील धातू सदृश्य कचरा संकलित करून तो शास्त्रोक्त पद्धतीने एका खड्ड्यात पुरला जाणार आहे. कचऱ्याचा ढीग बाजुला काढताना दुपारच्या वेळेत मिथेन वायू तयार होऊन कचराभूमीला आग लागण्याची किंवा दुर्गंधी पसरण्याची शक्यता आहे. या विचारातून प्रतिबंधात्मक उपाययोजना येथे करण्यात आल्या आहेत, असे घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.