हरित वसई संरक्षण समिताचा विरोध
किल्लाबंदर जेट्टीवर मोठा गाजावाजा करून उभारण्यात आलेल्या येशू ख्रिस्ताच्या पुतळ्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ही जागा केंद्र सरकारच्या मालकीचीे असून तेथे पुतळा का, असा सवाल हरित वसई संरक्षण समितीेचे अध्यक्ष मार्कुस डाबरे यांनी करून पुतळ्याला विरोध केला आहे.
वसईच्या किल्लाबंदर गावात राहणाऱ्या डिव्हन पावकर (२४) या तरुणाने स्वखर्चाने येशू ख्रिस्ताचा ८ फूट उंचीेचा पुतळा बनवला होता. हा पुतळा अतिशय सुंदर असल्याने त्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले. दोनच दिवसांपूर्वी किल्लाबंदर जेट्टीवर या पुतळ्याचीे विधिवत स्थापना करण्यात आलीे. सेंट पीटर चर्चचे धर्मगुरूदेखील यावेळी उपस्थित होते. जेमतेम शालेय शिक्षण घेतलेल्या मासेमारी करणाऱ्या या तरुणाच्या कलेचे सर्वत्र कौतुक होत होते. परंतु आता जेट्टीवर पुतळा बसविल्याने विरोध होऊ लागला आहे. हरित वसई संरक्षण समितीेचे अध्यक्ष मार्कुस डाबरे यांनी या पुतळ्याला तीेव्र विरोध केला आहे. ही जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. तेथे एका धर्माच्या श्रद्धास्थानाचा पुतळा कसा काय उभारला जाऊ शकतो असा सवाल त्यांनी केला. हा पुतळा पाहून इतर धर्मीयसुद्धा यांच्या श्रद्धास्थानाचे पुतळे उभारण्याचा आग्रह करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
पुरोगामीे ख्रिस्तीे धर्मीयांनीदेखील या गोष्टीला विरोध प्रकट केला असल्याचा दावा डाबरे यांनी केला. मात्र, या गावातीेल कार्यकर्ते आणि कोळी युवा शक्तीेचे अध्यक्ष दिलीेप माठक यांनी पुतळा उभारणे चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. ‘या तरुणाने स्वयंस्फूर्तीने पुतळा बनवला होता. त्याचे कौतुक म्हणून ग्रामस्थांनी जेट्टीवर त्याचीे स्थापना केली. यामागे कोणताही धार्मिक हेतू नाही,’ असे माठक म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2016 रोजी प्रकाशित
जेट्टीवरील ख्रिस्ताच्या पुतळय़ावरून वाद
हरित वसई संरक्षण समिताचा विरोध
Written by लोकसत्ता टीम

First published on: 02-04-2016 at 02:12 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harit vasai sanrakshan samiti jesus christ