जीवन दीप संस्थेच्या खर्डी महाविद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त महिला व महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये खर्डी महाविद्यालय व परिसरातील आदिवासी तसेच दुर्गम भागातील सुमारे २०० महिला व विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. यात ७०% महिला व मुलींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून आले. हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या महिला आणि मुलींसाठी आरोग्य केंद्रातर्फे मोफत औषधे देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सत्यवान पाखरे व आरोग्यसेविका पूनम महाजन यांनी फास्ट फूड शरीरास हानिकारक असून घरचा सकस आहार हेच निरोगी आरोग्याचे सूत्र आहे, असे मार्गदर्शन महिला व विद्यार्थिनींना केले. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, प्राचार्य पी. डी. पाटील तसेच महाविद्यालयातील प्रा. योगिता शिंदे, वैशाली मगर, दीपाली धात्रक, मीना बेकर, सुषमा पाल या शिबिरासाठी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 12th Mar 2015 रोजी प्रकाशित
आरोग्य शिबिराने महिला दिन साजरा
जीवन दीप संस्थेच्या खर्डी महाविद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त महिला व महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
First published on: 12-03-2015 at 07:49 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health camp on womens day