सरासरीच्या १४५ टक्के वृष्टी; कवडास, वांद्री धरण भरले
जिल्ह्य़ात रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १९०.०८ मि.मी. पाऊस पडला असून जूनपासून आतापर्यंत एकूण २२५७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत सरासरीच्या १४५.१६ टक्के पाऊस झाला आहे. शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी दुपारनंतर विश्रांती घेतली.
जिल्ह्य़ातील तालुकानिहाय पावसाची २४ तासांतली आकडेवारी (मि.मी.) पुढीलप्रमाणे : वसई- २१४.३३, वाडा- २५२.८१, डहाणू- ७०.७०, पालघर- २२२.३३, जव्हार- २३१.७५, मोखाडा- २५८.५०, तलासरी- ८५.६३ आणि विक्रमगड- १८७.८८.
यावर्षी आतापर्यंत वसई तालुक्यात २१५०.४२ मिमी, वाडा- २७१०.५५, डहाणू-१९५८.६५, पालघर- २३५१.१६, जव्हार- २३५१.०१, मोखाडा- २२१४.३९, तलासरी- १९९४.२३ आणि विक्रमगड तालुक्यात- २३४६.१३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्य़ातील धामणी धरणाची रविवारची पाणी पातळी ११७ मीटर, तर पाणीसाठा २५५.२२१ द.ल.घ.मी. होता. कवडास उन्नैयी बंधाऱ्याची पाणी पातळी ६६.९० मीटर तर पाणीसाठा ९.९६ द.ल.घ.मी. झाला आहे. हा बंधारा १०० टक्के भरला आहे. वांद्री मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी ४४.८२ मीटर असून पाणीसाठा ३५.९३ द.ल.घ.मी. इतका आहे. हे धरण देखील १०० टक्के भरले आहे. कुर्झे धरणाची पातळी ६८.८० मीटर, तर पाणीसाठा ३१.१५ द.ल.घ.मी. म्हणजेच ७९.७७ टक्के इतका आहे.
जिल्ह्य़ातील सूर्या नदीची (मासवण) पाणी पातळी ७ मीटर असून इशारा पातळी ११ मीटर आहे. वैतरणा नदीची पातळी १०२.०५ मीटर तर इशारा पातळी ११.९० आणि धोका पातळी १०२.१० आहे. िपजाळ नदीची पातळी १०२.८८ मीटर असून इशारा पातळी १०२.७५, तर धोका पातळी १०२.९५ इतकी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. रविवारी दिवसभर पावसाची तुलनेत उघडीप असल्याने जनजीवन काहीसे पूर्वपदावर येण्यास मदत झाली.