मनोहर सैंदाणे

मानव आणि वन्यप्राणी संघर्ष हा नवीन विषय नाही. काही उपाययोजना आणि योग्य व्यवस्थापनाद्वारे आपण त्याची तीव्रता कमी करू शकतो. मानवाशी ज्यांचा संघर्ष होतो अशा वन्य प्रजातींमध्ये मोठे मांसभक्षक प्राणी उदा. वाघ, सिंह, कोल्हे, मगर यांचा समावेश होतो. हत्ती, गवा तसेच काही हल्लेखोर हरीण या तृणभक्ष्यी प्राण्यांचा आणि मानवाचाही संघर्ष सुरू असतो. हा संघर्ष आपण कमी करण्यासाठी खालील प्रकारे उपाययोजना करू शकतो.

Konkan Planned Policy Continuity Major lack of enforcement Maharashtra Day 2024
कोकण: अभाव नियोजनबद्ध धोरण सातत्याचा..
ban on meat sale caste system marathi news
मांसविक्रीवर बंदी हा जातीव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न!
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?

– कमी दाबाचा विद्युत करंट देणे : सौर ऊर्जेपासून उत्पन्न झालेल्या विद्युत दाबाचा प्रवाह स्थानिक लोकांच्या तारेच्या कुंपणात सोडणे. अशा प्रकारे रानटी हत्तींना शेतापासून दूर ठेवता येते. ही पद्धत मुख्यत: दक्षिण आफ्रिकेत वापरण्यात येते. अशाच प्रकारची पद्धत जंगली अस्वल आणि वन्य तृणभक्ष्यी प्राण्यांसाठी वापरली जाते जेणेकरून वन्यप्राणी मानवी वस्ती आणि शेतीपासून दूर पळून जातील. मानवी आकाराचे बुजगावणे उभे करून त्यात घंटेसारखा आवाज देता येऊ शकतो. त्यामार्फत वाघालासुद्धा दूर ठेवता येऊ शकते.

– चमकता प्रकाश सोडणे : सौर ऊर्जेच्या उपकरणाद्वारे चमकता प्रकाश सोडता येऊ शकतो. अशा प्रखर झोतामुळे रात्री चरणारे वन्यप्राणी दूर ठेवता येऊ शकतात. याकरिता वेगवेगळ्या रंगीत दिव्यांची पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनची व्यवस्था केल्यास वन्यप्राणी वस्तीपासून दूर पळून जातात.

– क्रॉसिंग पॉइंटवर पूल उभारणे : संवेदनशील ठिकाणी पूल उभारणे हा उत्तम उपाय आहे. त्याबरोबर नॅशनल हायवे / स्टेट हायवेवर नैसर्गिक क्रॉसिंग रस्ता करता येऊ शकते. जेणेकरून वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडताना अपघात होणार नाही.

– मानवी उपाययोजना :  कृत्रिम पद्धतीने मधमाशा पालन करण्यासाठी वापरलेल्या पेटय़ा आणि मिरची पावडर शेताच्या किंवा घराच्या भोवती ठेवली जाते. हत्ती मधमाश्यांना घाबरतात. आफ्रिकन देशांमध्ये कंपाऊंडला लाल मिरची पावडर आणि तेल लावतात.  शेताभोवती कृत्रिम मधमाशी पेटय़ा ठेवल्या जातात.

– चेहऱ्याचे मागील मुखवटा : वाघ शक्यतो मागील बाजूने हल्ला करतात. त्यामुळे सुंदरबनमध्ये (पश्चिम बंगाल) मजूर जंगलात जाताना बनावट मुखवटा चेहऱ्याच्या मागील बाजूस लावतात, त्यामुळे वाघ हल्ला करत नाही. या उपायामुळे तिथे मागील तीन वर्षांत एकही दुर्घटना झालेली नाही.

– इको टुरिझम : स्थानिक आदिवासींना इको टुरिझमच्या कामात समावून घेतले तर त्यांना अर्थाजन होऊन त्यांच्या उपजीविकेस मदत होऊ शकते. स्थानिकांना इको टुरिझममध्ये रोड मार्गदर्शक किंवा प्रवासी मित्र अशी कामं करता येतील. यासाठी त्यांना प्रशिक्षण देता येऊ शकते.

  वन्यप्राणी लोकवस्तीत येतात तेव्हा.. 

वन्यप्राण्यास पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या लोकांना पोलिसाच्या मदतीने पांगवावे. वन्यप्राणी विहिरीत पडला असेल आणि विहीर पाण्याने भरलेली असेल तर त्यात हळुवारपणे लाकडाचा ओंडका सोडावा. त्या ओंडक्याच्या साहाय्याने त्याला बाहेर काढावे. विहिरीत मोटारपंप असेल तर वीजपुरवठा बंद करावा. लांब शिडी विहिरीत सोडावी. जेणेकरून लहान वन्यप्राणी शिडीवरून चढून येईल. त्यास जंगलात/ खुल्या जागेत पळण्यास वाट करून द्यावी. वरील परिस्थिती नसेल तर वन्यप्राण्यास गनने भुलीचे इंजेक्शन द्यावे. त्यानंतर जनावरांच्या स्थानिक डॉक्टरकडून वन्यप्राण्यास तपासावे. त्यानंतर परिस्थिती योग्य असल्यास नजीकच्या वनामध्ये सोडावे.

अलिकडेच पुण्यातील कोथरुड भागात एक बिबटय़ा भरवस्तीत शिरला. वनकर्मचारी, पोलीस आणि जनावरांचे डॉक्टर तिथे पोहोचले. वन अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सदर बिबटय़ास भुलीचे इंजेक्शन देण्याचे ठरविले. पण बिबटय़ा हलल्याने दोनदा नेम चुकला. पुढचा दिवस तो भर वस्तीत इकडून तिकडे पळत राहिला. रात्री पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला गोळी मारण्याची परवानगी मागितली. परंतु परिस्थिती नियंत्रणात असल्याने परवानगीची सध्या गरज नसल्याचे उत्तर देण्यात आले. त्यास भुलीचे इंजेक्शन ट्रॅक्युलाइज गनने देण्यासाठी महापालिकेकडून मर्कल शिडी गाडी मागविण्यात आली. तिच्यावर बसून बिबटय़ाला ट्रॅक्युलाइज गनने इंजेक्शन देण्यात कर्मचारी यशस्वी झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला वनात सोडण्यात आले.