पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेणाऱ्या पतीने शुक्रवारी रात्री नऊ वाजता कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवरुन जात असताना पत्नीवर अचानक चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झालेली पत्नी स्कायवाॅकवर रक्ताच्या थोराळ्यात पडली. हल्लेखोर पळून जात असलेल्या पतीला पकडून पादचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गंभीर जखमी पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विकास पाटील असे हल्लोखोर पतीचे नाव आहे. विकास आणि पत्नी प्रविणा हे कल्याण जवळील आंबिवली येथे राहतात. विकास हा प्रविणाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारझोड करत होता. यावरुन दोघांच्यात नेहमी वाद होत होते. शुक्रवारी रात्री विकास पाटील, पत्नी प्रविणा कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवरुन घरी जात होते. याावेळी त्यांच्यात चारित्र्याच्या संशय विषयावरुन बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर वादात झाले. यावेळी विकासने जवळील धारदार चाकू काढून त्याने पत्नी प्रविणाच्या गळा, मानेवर वार केले. तिने प्रतिकार केला. त्यास विकासने दाद दिली नाही.

पत्नी रक्तबंबाळ झाल्याचे पाहताच विकास घटनास्थळावरुन पळून जाऊ लागला. स्कायवॉकवरील पादचाऱ्यांनी विकासचा पाठलाग करुन त्याला पकडले. त्याला महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात दिले. विकास विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात पत्नी प्रविणाच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.