ठाणे : शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव परिसरातील ‘ठाणे महापौर बंगला’ या वास्तुमध्ये शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे स्मारक तर, ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात महापौर बंगला उभारण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा ठाणे महापालिका प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात केली असून यामुळे गेले अनेक वर्षे राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असलेला महापौर बंगला इतिहास जमा होण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिकेचा यंदाच्या वर्षाचा म्हणजेच २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता ५०२५ कोटी १ लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरूवारी सादर केला. कोणतीही कर व दरवाढ नसलेला काटकसरीचा अर्थसंकल्प, महसुली उत्पन्न वाढीवर भर, खर्चामध्ये वित्तीय शिस्त, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवा यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांवर भर, भांडवली कामांतर्गत हाती घेतलेली कामे पुर्ण करण्याचे नियोजन, प्रशासकीय कामकाजामामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता यावर भर, कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष, अशी यंदाच्या अर्थसंकल्पाची उद्दीष्ट्ये आहेत. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात विविध विभागांच्या करापोटी अपेक्षित धरण्यात आलेल्या उत्पन्नापैकी ९८ टक्के उत्पन्न प्राप्त झाले असले तरी पालिकेवर १२०० कोटीचे दायित्व आहे. पालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन खर्चामध्ये वित्तीय शिस्त लावण्यावर भर देण्याबरोबरच आवश्यक महसुली आणि भांडवली खर्च करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्था, पाणी पुरवठा, वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेत सुधारणा, महिला, युवा, ज्येष्ठ यांच्या कल्याणकारी योजनांसह शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे स्मारक, शहराच्या मध्यवर्ती भागात महापौर निवास, आनंदाश्रम परिसर सुधारणा अशा प्रकल्पांची घोषणा केली आहे.

dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Chandrakant Patil instructs angry workers to leave the hall in maval
महायुतीच्या मेळाव्यात ‘मानापमान’ नाटय़; चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘नाराज’ कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

हेही वाचा : डोंबिवलीतील ५० कोटींच्या टीडीआर घोटाळ्याची पुढील आठवड्यात हायकोर्टात सुनावणी

महापौर बंगला दुसऱ्या जागेत

ठाणे शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव परिसरात ‘ठाणे महापौर बंगला’ आहे. शहरातील राजकीय घडामोडींचे केंद्र म्हणून हा बंगला ओळखला जातो. निवडणुकांच्या काळात पक्षाच्या गुप्त बैठका आणि रणनिती आखण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून याच बंगल्यातून होते, अशी चर्चा असते. यामुळे निवडणुकांच्या काळात हा बंगला सातत्याने चर्चेत असतो. परंतु या बंगल्याची जागा आता बदलली जाणार असून हा बंगला आता शहराच्या मध्यवर्ती भागात उभारला जाणार आहे. परंतु, शहराच्या नेमक्या कोणत्या भागात हा बंगला बांधला जाणार आहे, याविषयी जाहिर करण्यात आलेले नाही.

हेही वाचा : Video : जादूटोण्याच्या संशयावरून वृध्दाला आगीवरून चालवले; मुरबाडमधील धक्कादायक प्रकार, नऊ जणांविरुद्ध गुन्हा

धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मारक

‘ठाणे महापौर बंगला’ या वास्तुमध्ये शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे स्मारक उभारण्याची घोषणा ठाणे महापालिका प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हे स्मारक तयार करण्याचे प्रयोजन आहे. त्याचबरोबर सभोवतालच्या परिसराचाही विकास केला जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे स्मारक ठाणे शहरात व्हावे अशी लोकभावना होती. यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर दिघे यांचे कार्यालय असलेल्या आनंदाश्रम परिसराचा सौंदर्यांत्मक विकास करण्यात येणार आहे. त्यामध्ये सुशोभित पदपथ, आकर्षक रस्ते दुभाजक, शोभीवंत दिवे , फलक , भित्तीचित्रे, याचा समावेश असणार आहे. त्यासाठी एक कोटींची तरतुद करण्यात आली आहे.