scorecardresearch

ठाण्यात घराच्या छताचे प्लास्टर पडून दोनजण जखमी

ही घटना घडली त्यावेळेस घरामध्ये एकूण चार व्यक्ती होत्या.

ठाण्यात घराच्या छताचे प्लास्टर पडून दोनजण जखमी
(संग्रहीत छायाचित्र)

ठाण्यातील बाळकुम भागात आज (सोमवार) पहाटे एक मजली घराच्या छताचे प्लास्टर पडून दोनजण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

आशा मनोहर पाटील ( ४४) आणि आयुष मनोहर पाटील (२०) अशी जखमींची नावे आहेत. बाळकुम पाडा नंबर-१ येथील सखुबाई टॉवर जवळ, पाटील आळीमध्ये मनोहर रामकृष्ण पाटील यांचे एक मजली घर आहे. आज पहाटे त्यांचे कुटुंब घरात झोपले होते, त्यावेळेस छताचे प्लास्टर पडले. ही घटना घडली त्यावेळेस घरामध्ये एकूण चार व्यक्ती होत्या. त्यापैकी दोन व्यक्तींना दुखापत झाली आहे.

आशा पाटील यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर, आयुष पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.