डोंबिवली शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्यावर गुरुवारी रात्री एका व्यक्तीने शाई फेकल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदीवरून शेतकऱ्यांची हेटाळणी केल्याने संतप्त शिवसैनिकांनी दानवे यांच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढली होती. सत्तेत असूनही शिवसैनिक असा प्रकार करत असल्यानेभाजपमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. अखेर या धुसफूसीचे पर्यवसान शाईफेकत झाल्याची चर्चा सुरू आहे.

चौधरी हे गुरुवारी पनवेल पालिकेचा प्रचार करून घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्या घराजवळ भाजपचा एक नगरसेवक त्याच्या समर्थकासह उभा होता. नगरसेवकाने चौधरी यांना जवळ येण्याचे खुणावले. त्याचवेळी त्या नगरसेवकासोबत असलेल्या व्यक्तीने थेट भाऊसाहेब यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. घडल्या प्रकारामुळे चौधरी एकदम सतर्क झाले. ही माहिती शिवसैनिकांना कळताच ते मोठय़ा संख्येने शहर शाखा, भाऊ यांच्या घराजवळ जमा झाले होते. त्यांच्या समर्थकांनी भाऊसाहेबांच्या घराजवळ हा सगळा प्रकार घडल्याचे सांगितले. दानवे यांच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.  याप्रकरणी गुन्हा दाखल करायचा की नाही याविषयीची चर्चा शिवसेनेत सुरू आहे.

Mahayutis Srirang Barne Show of Power An 80-year-old lady Shiv Sainik also participated in rally
महायुतीच्या श्रीरंग बारणेंचं शक्ती प्रदर्शन; ८० वर्षाच्या कट्टर शिवसैनिक आजीही रॅलीत सहभागी
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत