दादोजी कोंडदेव क्रीडासंकुलात उभारणी, पालिकेमार्फत प्रशिक्षकांची नियुक्ती
नेमबाजी या क्रीडा प्रकारात जागतिक पातळीवर अग्रेसर असलेल्या भारताला महाराष्ट्रातून अनेक नेमबाज लाभले आहेत. यात भविष्यात आणखी भर पडण्याची सुचिन्हे असून ठाणे शहरात उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘रायफल शूटिंग रेंज’मुळे नेमबाजांना अतिशय उत्तम दर्जाचे प्रशिक्षण घेता येणार आहे. ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल येथे ही ‘शूटिंग रेंज’ (नेमबाजी केंद्र) उभारण्यात येणार असून या केंद्रातील प्रशिक्षकांची नेमणूकही महापालिकेमार्फतच करण्यात येणारआहे.
दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील कैलासवासी खंडू रांगणेकर इमारतीच्या तळ मजल्यावर ही रेंज उभारण्यात येणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली आहे. ठाणे शहरात काही खासगी संस्थांमार्फत नेमबाजांसाठी अशाप्रकारच्या शूटिंग रेंज उभारण्यात आल्या असल्या तरी आंतराराष्ट्रीय दर्जाच्या सरावासाठी उपयुक्त नसल्याचे मत ठाण्यातील नेमबाजांकडून वेळोवेळी व्यक्त करण्यात येत होते. या पाश्र्वभूमीवर महापालिकेनेच अद्ययावत ‘नेमबाजी केंद्र’ उभारावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासूत सातत्याने होत होती. पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नरेश म्हस्के आणि माजी महापौर अशोक वैती यांनी याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला होता. त्याला पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मान्यता दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशी असेल ‘शूटिंग रेंज’
* एकावेळी १६ खेळाडूंना एका रांगेत सराव करण्याची सुविधा.
* संपूर्णपणे वातानुकूलित केंद्र.
* सराव पाहण्याची प्रेक्षकांना सुविधा.
* आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांची नियुक्ती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International quality shooting center in thane
First published on: 25-02-2016 at 06:08 IST