scorecardresearch

कल्याण : दारूसाठी पैसे न दिल्याने माथाडी कामगाराचा गळा चिरला

हल्लेखोर पसार झाला असून याप्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने चिडलेल्या एका इसमाने माथाडी कामगार असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. माथाडी कामगारच्या गळ्यावर शस्त्राने वार करून गळा चिरण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर पसार झाला असून याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी माथाडी कामगारावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माथाडी कामगार असलेले शंकर मनोहर कांबळे शुक्रवारी रात्री जेवण करून कल्याण पश्चिमेतील ओक बाग जवळील पदपथावर बसले होते. कांबळे यांच्या परिचयाचा असलेला शिवाजी उर्फ शिवा वाकचौरे तेथे आला. बिर्ला महाविद्यालयजवळ तो राहतो. शंकर यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे देण्याची मागणी त्याने सुरू केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या शिवाने प्रथम शिवीगाळ करीत आपल्या जवळ असलेल्या धारदार चाकूने शंकर कांबळे यांच्यावर हल्ला केला आणि शस्त्राने गळा कापला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात शिवाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kalyan mathadi worker attack for not paying for alcohol abn