भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण – कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील शक्तिधाम इमारतीमध्ये प्रसूतीगृह सुरू करण्याचा प्रस्ताव अजूनही प्रशासनाच्या लालफीतीच्या कारभारात अडकला आहे. चार माळ्याची ही वास्तू रिकामी असल्याने रात्रीच्या वेळेत परिसरातील तरूणांची टोळकी येथील सुरक्षा रक्षकाला दमदाटी करून इमारती मधील रिकाम्या खोल्यांमध्ये बसून मद्याच्या मेजवान्या करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येऊ लागला आहे. या परिसरातील रहिवाशांनी यासंबंधीच्या तक्रारी महापालिकेत केल्या आहेत.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

हेही वाचा >>> ठाण्यात आढळला करोना रुग्ण; कळवा रुग्णालयात उपचार सुरू

शक्तीधाम इमारतीला रात्रीच्या वेळेत पालिकेचा एकच सुरक्षा रक्षक असल्याने त्याला दमदाटी करून जबरदस्तीने तरूण सुरक्षा रक्षकाकडून चावी काढून घेतात. आत जाऊन पहाटेपर्यंत मद्याच्या मेजवान्या करतात. याठिकाणी हे तरूण रात्री उशिरापर्यंत धिंगाणा घालत असल्याने परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत. कोळसेवाडी भागात महापालिकेला विकासकाकडून सर्व समावेश आरक्षणाखाली शक्तिधाम ही इमारत बांधून मिळाली आहे. या इमारतीचे आरक्षण प्रसूतीगृहाचे आहे. शक्तिधाम इमारतीत प्रसूतीगृह सुरू करण्यासाठी महापालिकेने डिसेंबर २०२२ मध्ये निवीदा प्रक्रिया सुरू केली. या प्रसूतीगृहात बहुद्देशीय रुग्णसेवा रुग्णालय सुरू करण्याची मागणी या भागातील काही माजी नगरसेवकांंनी महापालिकेकडे केली. यासाठी राजकीय दबाव आणण्यात आले. या वादात वर्षभराच्या कालावधीत या नस्तीचा प्रवास अडखळला. माजी आयुक्त डॉ. दांगडे यांनी या नस्तीवर गेल्या फेब्रुवारीमध्ये चर्चा करा, असा शेरा मारला.

दारुड्यांचा वावर

शक्तिधाम ही प्रशस्त वास्तू रिकामी आहे. या वास्तूत रात्रीच्या वेळेत तरूणांची टोळकी मद्याच्या मेजवान्या करण्यासाठी येतात. याठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात आहे. त्याला दमदाटी करून त्याच्याकडून चावी घेऊन खोल्या उघडल्या जातात, अशा तक्रारी आहेत. या मद्य मेजवान्यांमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी या महत्वपूर्ण विषयात लक्ष घालण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक पदाधिकारी वाघमारे यांनी केली आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात इमूग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन ! बँकेच्या कर्जवसुलीमुळे शेतकरी आक्रमक

शक्तिधाम प्रसूतीगृहाच्या इमारतीचे मजबुती सक्षमता प्रमाणपत्र घेणे, स्ट्रेचर उद्वाहन क्षमता, अग्नि प्रतिबंधक उपाय योजनांच्या ना हरकतीसाठी नस्ती अग्निशमन विभागाकडे पाठविली आहे. त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. अर्जुन अहिरे शहर अभियंता.

नस्ती आमच्याकडे आली होती. ती तपासून काही सूचना केल्या आहेत. त्यांचे अनुपालन करून नस्ती पुन्हा पाठविण्याची मागणी केली आहे. संबंधितांकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. नामदेव चौधरी साहाय्यक अग्निशमन अधिकारी कल्याण.

या नस्तीचा पाठपुरावा करत आहोत. आयुक्तांसमोर लवकरच याविषयाची चर्चा होईल. या इमारतीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी वाढीव सुरक्षा ठेवण्याची मागणी सुरक्षा विभागाकडे केली जाईल. डॉ. अश्विनी पाटील– वैद्यकीय आरोग्य अधिकारी.