• अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांचे प्रतिपादन
  • ‘ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मधील भाग्यवान विजेत्यांना पारितोषिके प्रदान

‘महाराष्ट्रातील लाखो वाचकांच्या विचारांची जडणघडण ‘लोकसत्ता’मुळे होते. मीसुद्धा त्यापैकी एक आहे,’ अशा शब्दांत झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांनी भावना व्यक्त केल्या. ‘ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मधील भाग्यवान विजेत्यांना पारितोषिके देण्यासाठी आयोजिक कार्यक्रमात अनिता यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलचा पारितोषिक वितरण सोहळा वामन हरी पेठे सन्स येथे गुरुवारी पार पडला. अभिनेत्री अनिता दाते-केळकर, वामन हरी पेठे सन्स ठाणे विभागाचे व्यवस्थापक लुईस डिसूझा तसेच यू आर फिटनेस्टच्या डॉ. पूनम प्रधान आणि प्रसाद प्रधान यांच्या हस्ते भाग्यवान विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली.

२४ जानेवारीला सुरू झालेल्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या दुकानांमध्ये खरेदी केलेल्या काही भाग्यवान विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.  गुरुवारी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभातही विजेत्यांचा उत्साह दिसून आला. खरेदी केलेल्या वस्तूंवर अनपेक्षितरीत्या पारितोषिक मिळाल्याने विजेत्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. अनिता केळकर-दाते यांनी शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या एस. कुमार गोल्ड अ‍ॅण्ड डायमंड, शगुन सारीस्, रंगाली साडी, चॉइस सारीज् अ‍ॅण्ड ड्रेसेस या दुकानांनाही भेट दिली.

‘प्रेमाचा त्रिकोण असलेल्या या मालिकेत एका सर्वसामान्य स्त्रीची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. या मालिकेतील राधिका सुभेदार ही व्यक्तिरेखा महिलांना आधार देणारी आहे. त्यामुळे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका माझ्या अत्यंत आवडती आहे,’ असे मत अनिता दाते-केळकर यांनी या वेळी मांडले.

प्रायोजक

  • मुख्य प्रायोजक : ‘सॉफ्ट कॉर्नर’
  • सहप्रायोजक : पितांबरी
  • ट्रॅव्हल पार्टनर : केसरी
  • बँकिंग पार्टनर : युनियन बँक
  • वेलनेस पार्टनर : यू आर फिटनेस्ट
  • हॉस्पिटॅलिटी पार्टनर : द ग्रिल हाऊस
  • असोसिएट पार्टनर : टिप टॉप प्लाझा, कलाकृती, ऑरबिट, कॅरॉन किड्स
  • पॉवर्ड बाय : तन्वीशता, वामन हरी पेठे सन्स, प्रशांत कॉर्नर, मॅक्रो फाइन
  • गिफ्ट पार्टनर : अर्थव स्पीच अ‍ॅण्ड हिअरिंग केअर (बम्पर गिफ्ट पार्टनर), सरलास्, ओमकार किचन वर्ल्ड, राजदीप इलेक्ट्रॉनिक, कलानिधी, एस. कुमार गोल्ड अ‍ॅण्ड डायमंड, चॉइस सारिस् अ‍ॅण्ड ड्रेस आणि द रेमण्ड शॉप.

विजेत्यांच्या प्रतिक्रिया..

मी वामन हरी पेठे सन्स येथे खरेदी केली होती. त्यांनी अर्जाबद्दल सांगितल्यावर सहज गंमत म्हणून अर्ज भरला. पारितोषिक मिळाल्याचे समजले तेव्हा खूप आनंद झाला. अशा प्रकारच्या योजना ग्राहकांना खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करतात. यापुढेही ‘लोकसत्ता’ने अशा योजना राबवाव्यात.

मेघा डुगळे, सोन्याचे नाणे

चिंतामणी ज्वेलर्स येथे खरेदी केली होती. त्या ठिकाणी औपचारिकता म्हणून ‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिवल’चा भरलेल्या अर्जामधून अशा प्रकारे बक्षीस मिळेल असे वाटलेच नव्हते. अनिता दाते-केळकर यांनी हे बक्षीस दिल्याचा विशेष आनंद झाला आहे.

कीर्ती दहिवाडकर, चांदीचे नाणे

लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालो होतो. असे असूनही ग्राहकांकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. पुढील वर्षीही या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल. अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांनी दुकानाला दिलेल्या सदिच्छा भेटीमुळे आनंद झाला.

जनेश मॅथ्यू, एस. कुमार गोल्ड अ‍ॅण्ड डायमंडचे विपणन व्यवस्थापक

लोकसत्ता शॉपिंग फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याचे हे तिसरे वर्ष आहे. त्यामुळे ‘लोकसत्ता’ परिवार आणि लाखो वाचकांचे वाचकांशी नाते अधिक घट्ट झाले. लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिवलची आम्ही दरवर्षी आतुरतेने वाट पाहतो.

निमेश गडा, प्रो. शगुन साडीज्

लोकसत्ता शॉपिंग फेस्टिवल योजनेमुळे दुकानांमध्ये ग्राहकांचा प्रतिसाद वाढला. शिवाय अशा योजनांमुळेच ग्राहक आणि विक्रेते यामध्ये चांगले नाते तयार होते. ग्राहकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे लोकसत्ताने ग्राहक आणि विक्रेत्यांच्या हिताच्या असणाऱ्या योजना नेहमीच राबवाव्यात.

प्रेमजीभाई बोरीचा, प्रो. रंगोली साडी

लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याचे आमची पहिलीच वेळ आहे. या उपक्रमाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. अशा उपक्रमांमुळे वाचक आणि विक्रेते यांना दुहेरी फायदा मिळतो. तसेच अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांनी दुकानाला दिलेली भेट अविस्मरणीय आहे.

हरेश गाला, चॉइस सारिज् अ‍ॅण्ड ड्रेसेस