डोंबिवलीकर महिला डॉक्टरचा उपक्रम; १९३ किमीच्या स्पर्धात सहभाग
डोंबिवलीतील घरडा सर्कलजवळील सावळाराम महाराज क्रीडा संकुलात दररोज डॉक्टर पतीच्या जोडीला शतपावली करता करता, एका डॉक्टर पत्नीला धावण्याची ईर्षां निर्माण झाली. धावता धावता देशात, राज्यात होत असलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ही डॉक्टर महिला सहभागी होऊ लागली. अनेक स्पर्धामध्ये बाजी मारली. आपला वैद्यकीय पेशा सांभाळून, प्रत्येकाला आरोग्य, सुदृढतेचा संदेश देण्यासाठी ही महिला नियमित चालण्याचा सराव करतेच. त्याचबरोबर अवयव दानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ही डॉक्टर महिला निकराने प्रयत्न करीत आहे.
डोंबिवली एमआयडीसीत पती डॉ. राजकुमार पाटील त्यांच्या डॉक्टर पत्नी डॉ. शोभा पाटील आपल्या मुलासह राहतात. पती नियमित डोंबिवलीतील घरडा सर्कल येथील क्रीडा संकुलात सकाळ, संध्याकाळ शतपावली करण्यासाठी जातात. म्हणून डॉ. शोभा याही नियमित पतीबरोबर शतपावलीसाठी जाऊ लागल्या. हळूहळू त्यांनी धावण्यास सुरुवात केली. तब्येत सुदृढ असल्याने प्रत्येक मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हायचा निर्णय त्यांनी घेतला. मॅरेथॉन स्पर्धेचा सराव करण्यासाठी डॉ. शोभा पतीसह काटई ते बदलापूर जलवाहिनी मार्गावर दर रविवार धावू लागल्या. या रस्त्यावर नियमित सराव करणारे विविध क्षेत्रातील धावपटूंचे गट डॉ. शोभा यांना मिळाले. या गटाच्या सहकार्याने डॉ. शोभा यांचे मनोधैर्य आणखी उंचावले. कुटुंब सांभाळायचे, सकाळ, संध्याकाळ दवाखान्यात रुग्ण सेवा करायची. हे सगळे करताना धावण्याचा नियमित सराव.
त्यात अवयव दानाचे महत्त्व आप्तेष्ट, सरावात भेटणाऱ्यांना सांगायचे, असा शिरस्ता डॉ. शोभा पाटील यांनी कायम ठेवला आहे. अधिकाधिक तरुण, तरुणी, ज्येष्ठांनी चालावे, धावावे. त्यामुळे आरोग्य सुदृढ राहते. उत्तम व्यायाम, आहार विहार सांभाळले तर, डॉक्टरकडे जाण्याची कोणाला गरजच भासणार नाही, असा प्रचार त्या करीत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवयव दानाचा संकल्प
डॉ. शोभा यांनी आपले किडनी, हदय, नेत्र, यकृत हे अवयव दान करण्याचा संकल्प सोडला आहे. क्रीडाविषयक क्षेत्रात कामागिरी करणाऱ्या व्यक्तीसाठी ते वापरावेत, अशी त्यांची मनोमन इच्छा आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathon run for promotion of organ donation
First published on: 26-02-2016 at 03:35 IST