लोकसेवा समिती, डोंबिवली या सामाजिक संस्थेने आपल्या १८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १४ ते १७ जानेवारी २०१६ या काळात अरुणोदय सोसायटी मैदान, भोईरवाडी, महात्मा फुले रोड, डोंबिवली (प.) येथे भव्य कोकण महोत्सवाचे आयोजन केले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात लेझीम स्पर्धा, गोफनृत्य, रेल्वे प्रवासी संगीत भजन स्पर्धा, दशावतार, महिला संगीत भजन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम , गुणवंत मुलांचा गौरव, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. आंबोळ्या, सुकी मच्छी, कुल्र्याचे सांबार आणि कोंबडी-वडे हे या महोत्सवाचे वैशिष्टय़ आहे.