कचरा व गाळामुळे तलावपाळीला अवकळा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहराचे सांस्कृतिक केंद्र अशी ओळख असलेल्या तलावपाळी अर्थात मासुंदा तलावात पुन्हा एकदा कचऱ्याचे ढीग साचू लागले असून उन्हाळ्यात पाण्याची पातळी घटू लागल्याने इतके दिवस तळाशी दडलेला कचरा आता काठावर दिसू लागला आहे. खाद्यपदार्थ, निर्माल्य, मातीच्या मडक्यांमधून टाकलेली घाण, दारूच्या बाटल्या, नारळाच्या करवंटय़ा आणि प्लास्टिकचे ढीग या तलावाच्या चारही दिशेने दर्शन देऊ लागले आहेत. या कचरा प्रदूषणामुळे मासुंदा तलावातील मासे मृत पावत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून मृत माशांमुळे या भागात दरुगधी पसरली आहे. मासुंदा तलावाचे सुशोभीकरणाचे मोठाले प्रकल्प एकीकडे महापालिकेमार्फत आखले जात असताना दुसरीकडे या तलावाला कचऱ्याचा विळखा पडल्याने ठाण्यातील पर्यावरणप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Masuda lake cleanliness issue
First published on: 06-05-2017 at 01:51 IST