भिवंडी येथील गायत्रीनगर परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजून एका युवकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गायत्रीनगर भागात आमीन राहत असून त्याने दोन महिन्यांपुर्वी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजले. यानंतर याच भागातील एका घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिच्याकडे असलेले पैसेही चोरले.
या प्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून दोन महिन्यांनंतर शांतीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलिसांनी आमीनला अटक केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2015 रोजी प्रकाशित
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
भिवंडी येथील गायत्रीनगर परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजून एका युवकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.
First published on: 05-02-2015 at 01:05 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor molested in bhiwandi