अल्पवयीन मुलावर वर्गमित्राकडून लैंगिक अत्याचार

या विद्यार्थ्यांच्या लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ त्यांच्याच परिसरातील एका तरुणाच्या हाती आली.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अंबरनाथ : अंबरनाथ येथील खासगी मराठी माध्यमाच्या शाळेतील एका विद्यार्थ्यांवर वर्गातील दोन मित्रांनीच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमावर पसरल्याने हा प्रकार उघडकीस आला असून पीडित विद्यार्थ्यांने आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणात आरोपी मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ पूर्व भागातील खासगी शाळेतील ९वी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांला त्याच्याच वर्गातील दोन अल्पवयीन विद्यार्थी पालिकेच्या स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. या दोन्ही विद्यार्थ्यांनी या प्रकाराची चित्रफीत तयार केली होती.

ते दोन्ही विद्यार्थी पीडित विद्यार्थ्यांला धमकावत पैशांची मागणी करत, पैसे न दिल्यास ही चित्रफीत समाज माध्यमावर पसरवण्याची धमकीही देत होते. धमक्यांना कंटाळून पीडित विद्यार्थ्यांने घरात फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या विद्यार्थ्यांच्या लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ त्यांच्याच परिसरातील एका तरुणाच्या हाती आली. या तरुणाने या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याला माहिती दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Minor student sexually assaulted by classmate in ambernath

ताज्या बातम्या