भाईंदर : मीरा भाईंदर शहरात मोकाट फिरत असलेल्या ३० हजार भटक्या श्वानांना रेबीजची लस देण्यासाठी महापालिका पाच दिवसीय विशेष मोहीम हाती घेणार आहे. यामुळे संपूर्ण शहर रेबीज मुक्त होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मीरा भाईंदर शहरात निर्बीजीकरण व लसीकरण न झालेले जवळपास ३० हजारांहून अधिक श्वान मोकाट फिरत आहेत. यामुळे शहरातील श्वानची संख्या झापट्याने वाढत असून श्वानदंशाच्या घटनेत देखील वाढ झाली आहे. मागील वर्षभरातील श्वान दंशाची आकडेवारी पाहता प्रति दिवस २८ जणांना हे श्वान चावा घेत आहेत.यामुळे मोकाट श्वानाची दहशत पसरू लागली आहे. तर याने रेबीजसारख्या गंभीर आजाराचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात केवळ ११ टक्केच नागरिकांना वर्धक मात्रेचे कवच; करोना वाढू लागताच मात्रा घेण्याचे आवाहन

bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
Mumbai, MHADA, Extends Deadline, E Auction, 17 Plots, Mumbai MHADA, mumbai news, mhada news, marathi news, e auction in mumbai,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदेला मुदतवाढ ? एक – दोन दिवसात निर्णय
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Sangli
सांगली : तक्रार मागे घेण्यासाठी हॉस्पिटलकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी

त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील मोकाट श्वानाचे रेबीज लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी महापालिकेला जागतिक पशुवैद्यकीय सेवा ( वर्ल्ड वेटरनेटी सर्व्हिसेस ) संस्थेची मदत मिळणार आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ पर्यंत असे पाच दिवस हे लसीकरण राबवले जाणार आहे. यासाठी प्रभाग स्तरावर एकूण ७ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच आरोग्य विभागातील २० अतिरिक्त कर्मचारी आवश्यकतेनुसार वापरले जाणार आहेत. प्रामुख्याने किमान २० हजार श्वानांना ही लस देण्याचे लक्ष असून त्या दृष्टीने काम केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी विक्रम निराटले यांनी दिली आहे.

हेही वाचा : कर्जबाजाराला कंटाळून वर्सोवा पुलावरून इसमाने मारली उडी; पोलीस व अग्निशमन कडून शोधकार्य सुरू

मोकाट श्वानांची आकडेवारी मिळण्यास मदत.

मीरा भाईंदर शहरात मोकाट फिरत असलेल्या श्वानांची आकडेवारी महापालिकेकडे उपलब्ध नाही. परिणामी झपाट्याने वाढणाऱ्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे रेबीज लसीकरणाची मोहीम घेत असताना मोकाट श्वानांची जनगणना करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. यामुळे महापालिकेला शहरातील नर व मादी श्वान, निर्बीजीकरण व लसीकरण झालेले श्वान आणि एकूण आकडेवारी मिळवण्यास मदत होणार आहे.