भाईंदर :- वर्सोवा पुलावरून खाडीत उडी मारणार्‍या अतुल धांडिया यांचा २४ तास उलटूनही शोध लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी स्थानिक पोलीस अग्शिनमदलाच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. भाईंदर येथे राहणारे अतुल धांडिया (५२) रविवारपासून ते घरी आले नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत ते बेपत्ता असल्याची तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात दिली होती.

हेही वाचा >>> ठाणे : भिवंडीत ८०० किलो प्लास्टिक जप्त, महापालिकेची कारवाई

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

त्यांचा शोध सुरू असताना बुधवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास धांडिया यांच्या भावाला ते वर्सोवा पुलावर दुचाकी जवळ उभे असलेले आढळून आले. मात्र भावाला समोर येताना पाहताच त्यांनी पुलावरून खाडीत उडी मारली. यावेळी ओहोटीची वेळ असल्यामुळे तो पाण्यात वाहत जात असल्याचे भावाने पाहिले होते. काशिमीरा पोलीस आणि अग्शिनमन विभाग त्यांचा शोध घेत आहे. मात्र २४ तास उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही. अतुल धाडिया हे बोरीवलीत खासगी कंपनीत नोकरीला होते. मात्र कर्जबाजारी असल्याने मानसिक तणावात होते. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.