महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी ठाण्यातील सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी आव्हाड यांच्या मतदारसंघामध्ये कशाप्रकारे दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो याबद्दल भाष्य केलं. अगदी बातम्यांच्या कात्रणांसहीत राज ठाकरेंनी सभेमध्ये आव्हाडांवर निशाणा साधला. या टीकेला आव्हाड यांनी उत्तर देताना मी तिथे गेल्यानंतर दोन ते तीन प्रकरणं घडल्याचा उल्लेख केला. मात्र आता या स्पष्टीकरणावरुनही मनसेनं आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडलं असून किती प्रकरणांनंतर आव्ह्डांना मुंब्र्यात काहीतरी वेगळं होतंय असं वाटलं असतं?, असा प्रश्न विचारलाय.

नक्की वाचा >> राष्ट्रवादी विरुद्ध मनसे वाद चिघळला : शरद पवारांचा चेहरा म्हशीच्या…; मनसेनं आव्हाडांना दिलं उत्तर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज नेमकं काय म्हणालेले?
राज ठाकरेंनी मुंब्र्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची यादीच मंगळवारच्या सभेदरम्यानच्या भाषणात सादर केलेली. “२४ ऑगस्ट २००१ सीमीच्या सहा हस्तकाना अटक, २० डिसेंबर २००१ अबु हमजा, १६ मार्ट २०२० हिजबुल मुजाहिदिनी चार अतिरेक्यांना अटक, २३ जानेवारी २००४ एक दहशतवादी जेरबंद, २०१६ ला ताब्यात घेतलाल आयसीसचा मोरक्या, १६ मे २००३ मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी एकाला अटक, रिजवान मोबिन या संशयित अतिरेक्याला अटक, २६ जानेवारी २०१९ एका दहशतवाद्याला अटक”, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.

नक्की वाचा >> …तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरही गुन्हा दाखल करा; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेची मागणी

आव्हाडांचं उत्तर
राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना आव्हाड यांनी, “मी २००९ ला मुंब्र्यात गेलो, तेव्हापासूनचा इतिहास चाचपडून पाहा. फक्त दोनदा तेही बाहेरुन आलेले लोक ही अतिरेक्यांच्या रेकॉर्डवर आहेत. तेव्हा राज ठाकरेंनी बोलताना इतिहास जाणून घ्या. तुमच्यासमोर एक मुस्लिम बसला होता त्याचं उदाहरण दिलंत, त्याला दाढी नव्हती का? म्हणजे तुम्ही आता मुस्लिमांना प्रमाणपत्र देणार की देशद्रोही आहेत की देशप्रेमी…हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?,” असं म्हटलं.

नक्की वाचा >> “आजोबा होऊनही पोरकटपणा करणाऱ्या राज ठाकरेंनी…”; पवार नास्तिक असल्याच्या वक्तव्याला फोटो शेअर करत राष्ट्रवादीचं उत्तर

आव्हाडांना मनसेचं उत्तर
जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या या उत्तरावरुन ठाणे-पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना जाधव यांनी, “आव्हाडांचं काय काल रात्री काहीतरी वेगळं बडबडत होते. आज सकाळी अचानक त्यांना संस्कृतीची आठवण झाली. आज सकाळी काहीतरी वेगळं बोलतायत. काल कुठल्या तरी वेगळ्या मूडमध्ये असतील ते,” असा टोला लगावला.

…तर किती घरं उद्धवस्त झाली असती?
“आव्हाडांबद्दल काय बोलायचं ते जे बोललेत त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं आहेत. आव्हाडांचं सर्वात वाईट वक्तव्य हे की मी मुंब्र्यात आल्यानंतर दोन तीनच घटना घडल्यात. अरे दोन तीन घटना? २६/११ ची घटना आम्ही अजून विसरलेलो नाहीय. ज्यांच्या घरातली लोक गेलीयत त्यांना जाऊन विचारा २६/११ च्या घटनेनंतर त्यांच्या घरावर काय परिणाम झालाय. आहो तुमची एखादी घटना म्हणता. एखाद्या दहशतवाद्याने बॉम्बस्फोट केला असता शूट आऊट केलं असतं तर किती घरं उद्धवस्त झाली असती,” असं म्हणत जाधव यांनी आव्हाडांवर निशाणा साधला.

नक्की वाचा >> “राज ठाकरेंचा जन्म झाला त्या दिवशी शरद पवार…”; राज यांच्यासोबतचा पवारांचा फोटो शेअर करत राष्ट्रवादीचा टोला

…तर हजारो लोकांचा जीव गेला असता
“असं असलं तरी ते दोन तीनच घटना घडल्याचं सांगतायत. किती घटना घडायला हव्या होत्या ५०? मग तुम्हाला कळलं असतं का की मुंब्र्यात काहीतरी वेगळं घडतंय. अहो या दिसणाऱ्या आहेत. पोलिसांनी शोध लावलेल्या अनेक घटना आणि स्फोट घडवणारी अनेक लोक मुंब्र्यात राहून गेली. आव्हाडांनी अशी वक्तव्य करु नयेत. तुमच्या एखाद्या दुसरी घडली असती तर हजारो लोकांचा जीव गेला असता,” अशी टीका जाधव यांनी केलीय.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns slams jitendra awahad over his comment on mumbra terrorism connection scsg
First published on: 13-04-2022 at 16:24 IST