ठाणे : ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन थेट सर्वोच्च न्यायालयाचीच दिशाभूल केली असल्याचा दावा करत सर्वोच्च अशा शक्तीमान माणसाच्या नेतृत्वाखाली असे कटकारस्थान रचले जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सर्वोच्च शक्तीमान माणसाच्या सांगण्यावरूनच खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्याबरोबरच खोटे गुन्हे टाकले जातात. जे भाई लोक मोठ्या भाईलोकांशी दुबईमध्ये इथे-तिथे बोलतात. त्यांच्या केसेस दाबल्या जातात. उलट आम्हालाच प्रश्न विचारला जातो, असा आरोपही त्यांनी केला आहे. आव्हाड यांच्या आरोपाच्या निमित्ताने सर्वशक्तीमान माणूस कोण अशा चर्चेला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल समाजमाध्यमांवर अश्लील पोस्ट केल्याच्या आरोपावरून अनंत करमुसे यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला होता. या वादादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. याप्रकरणी ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे. करमुसे यांनी सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली असून याबाबत माहिती देण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका

हेही वाचा >>> उल्हासनगरात ठाकरे गटाला गळती सुरूच, विद्यमान शहरप्रमुखाचा माजी नगरसेवकासह शिवसेनेत प्रवेश

सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावली. तसेच, ज्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. त्याच न्यायालयात तीन महिन्यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. या खटल्याच्या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलेल्या अनेक बाबी खोट्या असल्याचे स्पष्टीकरण आव्हाड यांनी  यावेळी दिले. या खटल्यात ठाणे पोलिसांनी माझ्यावर चक्क २४ गुन्हे दाखल असल्याचे नमूद करणारे खोटे प्रमाणपत्र सादर करून मला अट्टल गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न केला असून त्याचबरोबर राबोडीची दंगल आटोक्यात आणल्याच्या नोंदी असतानाही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात चक्क ‘समाजात तेढ निर्माण करण्याचे काम मी करीत असल्याचे नमुद केल्याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील भजनभूषण नलिनी जोशी यांचे निधन

पोलिसांनी खोटे प्रमाणपत्र सादर करुन ऱाज्याची प्रतिमा खराब होणार आहे, याची कल्पना ठाणे पोलिसांना नाही का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ५ एप्रिल २०२०२ रोजी फेसबुकवर माझ्याविरोधात अश्लील पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीसोबत आमच्या काही कार्यकर्त्यांची हमरीतुमरी झाली होती. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सदर व्यक्तीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच फटकारले होते. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालय गाठले होते. सर्वोच्च न्यायालयात वाद-प्रतिवाद झाला. या व्यक्तीच्या मागे महाराष्ट्रातील सर्वशक्तीमान व्यक्ती उभी होती. या सर्वशक्तीमानसोबत राज्य सरकारही उभे होते, याबाबत कोणतीही शंका नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला. सर्व शक्तीमान माणसाने आर्थिक शक्ती निर्माण केली होती. त्या आर्थिक शक्तीच्या जोरावर आणि सर्व शक्तीमान माणसाच्या आधारावर ती व्यक्ती आपली तलवार सर्वोच्च न्यायालयात चालवित होती.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील आरव गोळे बालकाकडून धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया ३९ किमीचा सागरी टप्पा पार

सर्वोच्च न्यायालयात त्याला मदत व्हावी म्हणून राज्य सरकार म्हणजेच ठाणे पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. ते म्हणजे आधी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्याच्या बरोबर उलट प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. सरकार बदलल्यानंतर प्रतिज्ञापत्र बदलते, असे कधी होत नाही. पण, असे यावेळी घडले, असा आरोपही त्यांनी केला. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मला चक्क गुंड असल्याचे न्यायालयासमोर भासविण्यात आले. माझी गुन्हेगारी कारकिर्द असल्याचे प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले. वास्तविक पाहता, करमुसे प्रकरण वगळता माझ्यावर एकही शारीरिक इजेचा गुन्हा नाही. माझ्यावर जे गुन्हे दाखल आहेत, ते सर्व आंदोलनातील गुन्हे आहेत. पोलिसांनी जे २४ गुन्हे दाखविले आहेत. ते सर्वच राजकीय-सामाजिक आंदोलनातील असून यापैकी २० गुन्हे निकाली निघाले आहेत. या आंदोलनातील गुन्हे असणारी माणसेच राजकारणात असतातच. असे गुन्हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आहेत. मग, त्यांनाही अट्टल गुन्हेगार म्हणणार का? आपण कोणाच्या दबाखाली येऊन काय करतोय, याचे भान पोलिसांनी ठेवायला हवे, असेही आव्हाड म्हणाले.

मी विविध मोठ्या माणसांविरुद्ध सोशल मिडीया, ट्वीटरद्वारे टीका करतो. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. तसेच दोन समाजात वाद निर्माण होईल, असे ट्वीट करतो, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.  जर, मी अशी टीका केली आहे. तर, माझ्यावर तशी केस का घेतली नाही? अजूनही माझे आव्हान आहे की अशी केस करावी. जर, आपण दोन समाजात वाद निर्माण केला असेल तर आपणांवर गुन्हा दाखल करुन अटक का केली नाही?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव जेव्हा प्रतिज्ञापत्र सादर करतात. तेव्हा आपण खोटे लिहित आहोत, याची कल्पना नाही त्यांना? हा एवढा गंभीरपणे खोटे मुद्दे मांडणारे प्रतिज्ञापत्र सादरच कसे केले जाते? अमरसिंह जाधव यांचे हे प्रतिज्ञापत्र पोलीस आयुक्तांना विचारल्याशिवाय सादर झालेले नसणार, असा दावाही त्यांनी यावेळी केला.