scorecardresearch

अवाजवी देयक दिल्याने वीज कंपनीला दंड

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या शाखेतील उपकार्यकारी अभियंत्याला ग्राहक मंच न्यायालयाने धडा शिकविला आहे.

अवाजवी देयक दिल्याने वीज कंपनीला दंड

देयकातील फरकासह पाच हजार रुपये देण्याचे ग्राहक मंचचा आदेश
मीटरप्रमाणे रीडिंग न घेता ग्राहकाला भरमसाट बिल देणाऱ्या वृंदावन सोसायटी आणि विकास कॉम्प्लेक्स येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या शाखेतील उपकार्यकारी अभियंत्याला ग्राहक मंच न्यायालयाने धडा शिकविला आहे. तक्रारदार ग्राहकाला एकूण ५ हजारांची रक्कम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने द्यावी, असा आदेश ग्राहक न्यायालयाने दिला आहे.
ठाणे शहरात कोलबाड रोड येथे राहणाऱ्या शैलजा अनिल खडतरे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून २००५ मध्ये विद्युत पुरवठा घेतला होता. त्यानंतर २००९ पर्यंत विद्युत देयक वीज वापराप्रमाणे येत असल्यामुळे तक्रारदार नियमितपणे भरणा करत होते. त्यानंतर खडतरे यांना जानेवारी २०१० ते जुलै २०१० पर्यंतची विद्युत बिले वीज वापराप्रमाणे न देता अ‍ॅव्हरेज युनिट्स वापराप्रमाणे देण्यात आली. खडतरे यांनी वीज वापरापेक्षा जास्त रकमेच्या देयकाबाबत तक्रार केली असता तक्रारदारांचे मीटर सदोष असल्यामुळे मीटर बदलण्याचा अर्ज करण्याची सूचना दिली. त्यानंतर तक्रारदारांना मीटर बदलून दिले. मात्र महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे भरमसाट बिले देण्याचे काही थांबले नाही. त्यानंतर खडतरे यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली.
अखेर सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी तक्रारदारांना सदोष मीटर दिल्याचे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र वीज वितरण कं पनीने खडतरे यांना मानसिक त्रासापोटी ३ हजार व तक्रार खर्चाची रक्कम दोन हजार असे एकूण पाच हजार रुपये द्यावेत, असे आदेश न्यायमूर्ती माधुरी विश्वरूपे यांनी दिले आहेत. हल्ली चुकीची बिले येण्याची संख्या वाढली असून ग्राहकांनीतक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2016 at 01:00 IST

संबंधित बातम्या