अनधिकृत बांधकामाची नोटीस देण्यास गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना स्थानिक रहिवाशांनी मारहाण केल्याची घटना माजिवडा येथे घडली आहे. महानगरपालिकेत काम करणारे सुभाष सोनावणे, अशोक पाटील, राजेंद्र मेश्राम, मढवी हे माजिवडा गाव येथे रहाणारे सुरेश शिर्के यांना वाढीव बांधकामाविषयी नोटीस देण्यास सोमवारी गेले होते. यावेळी तेथे राहाणारे भारती कांबळे, बंटी वाल्मीकी, मनीष वाल्मीकी यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. कर्मचाऱ्यांनी यापूर्वी येथील अनधिकृत बांधकाम असलेल्या मंदिराचे फोटो काढून नेले होते, याचा राग धरून ही मारहाण करण्यात आली. तसेच परत या परिसरात आल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal employees assaulted for notice
First published on: 07-04-2016 at 00:01 IST