डोंबिवलीतील एसआयए महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली.‘माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती आणि परिवर्तन’ हे या परिषदेचे मुख्य विषय होता. माहिती तंत्रज्ञान आणि गणित विभागाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकसत्ता’ या परिषदेचा माध्यम प्रायोजक होता. या परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मॅक्स विल्यम डिकोस्टा उपस्थित होते. क्यूनॉक्स कन्स्टन्सी सव्र्हिसेसच्या ग्राहक संपर्क विभागामध्ये ते कार्यरत आहेत. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीकारक ठरणाऱ्या बदलांमुळे सध्याच्या व्यवसायामध्ये होणारे अमुलाग्र बदलांचा उहापोह डिकोस्टा यांनी या मार्गदर्शन सत्रात केला. भारतीयांसाठी या क्षेत्रामध्ये सुवर्ण संधी असून त्या आधारे भारतीय आतंराष्ट्रीय पातळीवरही दैदिप्यमान कामगिरी करू शकतात. जागतिक बाजारामध्येही भारतीय तंत्रज्ञ चांगला प्रभाव दाखवत आहेत. यावेळी विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पी. डी. शेंगडे यांनी वाहन सुरक्षेतील माहिती तंत्रज्ञानाची मदत, त्यातील कार्यक्षमता आणि नाविन्यपूर्णता याचा विस्तृत आढावा त्यांनी घेतला. माहिती तंत्रज्ञानातील चांगल्या शोधामुळे होणारे बदल उपस्थितांसमोर विषद केले. साऊथ इंडियन असोसिएशन डोंबिवलीचे सचिव के. व्ही. रंगनाथन यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तीन महत्वाच्या टप्प्यांची ओळख करून दिली. संगणकाचा शोध, इंटरनेट ुसुविधेचा उदय आणि त्याचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर झालेला परिणाम याविषयी ते बोलले. तंत्रज्ञान विषय सत्रामध्ये के. जे. सोमय्या महाविद्यालय व्यवस्थापन संशोधनाचे डॉ. आर कामाक्ची, एमसीसी महाविद्यालय मुलूंडचे प्रा. हिरेन दांडे, एसआयएचे डॉ. पद्मजा अरविंद यांनी यावेळी मार्गदर्शन केले.या परिषदेमध्ये २९ संशोधनपत्रे सादर करण्यात आली असून त्यांचा मुख्य भर माहितीच्या आदान प्रदान प्रणालीकडे होता. माहितीची साठवणूक, माहितीची उपलब्धता, माहिती तंत्रज्ञानाचे सुयोग्य आदानप्रदान प्रणाली, पर्यावरण व्यवस्थापनातील प्रणाली अशा विविध माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विविध संकल्पनांचे विस्तृत संशोधन यावेळी मांडण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती साऊथ इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष हरिहर शर्मा यांनी लावली होती.
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2015 रोजी प्रकाशित
डोंबिवली एसआयए महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
डोंबिवलीतील एसआयए महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली.

First published on: 01-09-2015 at 01:53 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National college conference arrange at dombivali collage