नौपाडा परिसरात शुक्रवारी दोन चोरीच्या घटना घडल्या असून एका घटनेत चोरटय़ांनी घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला तर दुसऱ्या घटनेत चोरटय़ांनी सीकेपी बँकेची दोन लाख रुपये किमतीची जीप चोरून नेली आहे.
व्रजविहारमध्ये राहणारे स्टिफन बिरावडकर (५६) यांच्या घरात शुक्रवारी चोरटय़ांनी चोरी करून पाच लाख ६० हजारांचा ऐवज लुटून नेला.
एव्हरग्रीन अपार्टमेंटमध्ये राहणारे मनीष पेडणेकर (३७) हे सीकेपी बँकेत वाहनचालक म्हणून काम करतात. त्यांनी नौपाडय़ातील जुना आग्रा रोडवर पार्क केलेली बँकेची जीप चोरटय़ांनी चोरून नेली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Feb 2015 रोजी प्रकाशित
नौपाडय़ात एकाच दिवशी दोन चोऱ्या
नौपाडा परिसरात शुक्रवारी दोन चोरीच्या घटना घडल्या असून एका घटनेत चोरटय़ांनी घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला तर दुसऱ्या घटनेत चोरटय़ांनी सीकेपी बँकेची दोन लाख रुपये किमतीची जीप चोरून नेली आहे.
First published on: 23-02-2015 at 02:42 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naupada two robberies on same day