कल्याण पूर्वमधील एका विकासकाच्या कार्यालयात शिरून त्याच्या कार्यालयाची तोडफोड करणारा शिवसेनेचा माजी नगरसेवक नवीन गवळी याला कल्याण न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी गवळी आणि त्याच्या २५ समर्थकांनी युसुफ झोजवाला या विकासकाच्या कार्यालयात घुसून त्याच्याकडे दहा कोटींची खंडणीची मागणी केली होती. ती न दिल्याने त्याला ठार मारण्याची आणि विकासकाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.
नवीन विकासकावर त्याच्या दुकानातून बांधकाम साहित्य घेण्यासाठी दबाव टाकत होता. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित २० जणांचा कोळसेवाडी पोलीस शोध घेत आहेत.  विकासकांना धमक्या येऊ लागल्याने पोलिसांनी खंडणीबहाद्दरांना नेस्तनाबूत करण्यासाठी नव्याने उपाययोजना हाती घेतली आहे. रवी पुजारी याच्या टोळीनेही काही दिवसांपासून विकासकांना धमक्या देणे सुरू केले होते.