‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामध्ये ३२ हजार महिलांची कथा सांगितली गेली आहे. पण, न्यायालयामध्ये चित्रपटाचा निर्माता स्वतः म्हणतो की, ही कथा केवळ ३ महिलांची आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. या चित्रपटाने जगभरात आपल्या देशाची बदनामी केली असून देशात धार्मिक विद्वेष पसरविणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

देशात अराजकता माजवण्याचा आणि देशाला बदनाम करणाऱ्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या निर्मात्याला फाशी देण्याचे विधान केले होते. त्याचा शब्दशः अर्थ घेऊन अनर्थ करण्यात आला. या एका वाक्यावर वाद निर्माण करायचे, असे प्रकार करण्यात येत आहेत. या चित्रपटाने देशाची बदनामी केली आहे, याची दखल कोणीच घेतली नव्हती. हे विधान केल्यामुळेच चित्रपटातील चुकीच्या गोष्टी समोर आल्या. तसेच माझे हे विधान संतापाचा कडेलोट होता. आपणाकडून व्यक्त झालेला शाब्दिक संताप होता, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. आता सबंध महाराष्ट्रासह पूर्ण देशाला कळेल की राजकीय पक्ष नेमके काय करत आहेत. चित्रपट बघायला सांगताहेत, पण, त्याआधी ३२ हजार मुली आहेत, हे सिद्ध करून दाखवा, असे विधान मी केल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. पण, मी जाहीरपणे सांगतो की डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा संविधानप्रेमी नागरिक आहे, असेही आव्हाड म्हणाले.

mira road, Woman Raped, Forced to Convert to Islam, case register against Six Accused, with obscene pictures money extorted, naya nagar police, mira road news, crime news, police,
तरूणीवर बलात्कार, केस कापून केले विद्रुप; मुस्लीम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा आरोप
mrunal thakur reveals she felt intimidated while working with Shahid Kapoor expert shares tips to overcome
मृणाल ठाकूरने सांगितले शाहिद कपूरबरोबर काम करताना दडपण येण्याचं कारण; वाक्यही न आठवण्याची स्थिती का आली?
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

हेही वाचा >>> “‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्याला फासावर लटकवलं पाहिजे”, जितेंद्र आव्हाड यांचं विधान; म्हणाले, “अधिकृत आकडा…”

केरळ भारतातील पूर्ण साक्षर राज्य म्हणून पुढे येत आहे. तिथे ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम हे तिघेही संख्येने कमी अधिक प्रमाणात सारखेच असले तरी तिथे कधीही टोकाचे जातीयवाद झाल्याचे दिसत नाही. त्याचे एक कारण म्हणजे येथील मल्याळम भाषा. या भाषेच्या समानतेमुळे तिथे धर्माची वेगळी ओळख कधी होऊच शकली नाही. दूरदेशातून जे परकीय चलन भारतात येते. त्यातील ३६ टक्के चलन हे केरळमधील परदेशी असलेले अनिवासी भारतीय पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी २.३४ लाख कोटी रूपये पाठविले होते. दरडोई उत्पन्न हे भारताच्या सरासरीपेक्षा ६० टक्के अधिक आहे. याचा अर्थ तेथील माणूस हा इतर राज्यातील नागरिकांपेक्षा श्रीमंत आहे. समुद्र किनाऱ्याचा विकास सर्वाधिक केरळने केला आहे. खाडीमध्ये पर्यटन ही संकल्पनाच केरळमधून आली आहे. अशा केरळला आणि आपल्या देशाला बदनाम करण्यासाठी  ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा >>> VIDEO: “केरळची सत्य परिस्थिती केरळची आहे, विदेशातून…”, आकडेवारी देत जितेंद्र आव्हाडांचं ‘द केरला स्टोरी’वर भाष्य, म्हणाले..

आपल्या देशाला जगभरात बदनाम करतात आणि नंतर बेशरमपणे न्यायालयात सांगतात की ३२ हजार नाहीत तीनच आहेत. त्यामुळे ३२ हजार मुलींचे धर्मांतर किंवा पलायन हा निव्वळ खोटारडेपणा आहे. कारण अधिकृत आकडा फक्त तीन आहे. आपल्या बहिणींबद्दल आपण संशय निर्माण करतो. आपल्या भगिनींना  मूर्खात काढणे, त्यांना अक्कलच नाही, असे दाखवतो. तेव्हा ही पुरूषप्रधान संस्कृतीचा आपल्यावर किती पगडा आहे, हेच आपण दाखवून देत असतो, असेही ते म्हणाले. या चित्रपटाचा टीझर पहा, त्यामधून तो निर्माता खोटी माहिती देशभर पसरवत आहे. त्यामुळेच त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. आज मणीपुरमध्ये नागरी युद्ध सुरू झाले आहे. ते आपण दाखवत नाही. पण, आपण हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्यात धन्यता मानत आहोत. त्यातून मते मिळणार आहेत, म्हणून जगात काय चाललंय या पेक्षा हिंदू-मुस्लीम वाद अधिक पेटवला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. लोकांच्या मनात द्वेष का निर्माण करीत आहात. कोणा एका मुलीने चूक केली असेल तर सर्व महिलांना का बदनाम करता, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.