महापालिकेचा आरक्षण बदलांचा प्रस्ताव तयार; मंजुरीसाठी लवकरच सर्वसाधारण सभेपुढे

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक अशी ओळख असणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीचा भार कमी व्हावा यासाठी गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर मूर्त स्वरूप मिळू लागले असून ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान कोपरी परिसरात असलेल्या मनोरुग्णालयाच्या जागेवरच हे स्थानक उभारण्याचा सविस्तर प्रस्ताव महापालिकेमार्फत तयार करण्यात आला आहे. स्थानक उभारणीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विकास आराखडय़ातील आरक्षणातील फेरबदलांची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. या फेरबदलांचा सविस्तर प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

ठाणे ते मुलुंड स्थानकांदरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित स्थानक उभारण्याचा प्रस्ताव तब्बल १५ वर्षांपूर्वी पुढे आला होता. माजी खासदार प्रकाश परांजपे यांनी हा प्रस्ताव सर्वप्रथम मांडला खरा, मात्र जागा हस्तांतरणाच्या कात्रीत तो सापडला. मनोरुग्णालयाच्या जागेवर हे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने यापूर्वीही तयार केला. मात्र, काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात आरोग्य विभागाने ही जागा हस्तांतरित करण्यास हरकत घेतल्याने हा प्रस्ताव मागे पडला. युती सरकार सत्तेवर येताच पुन्हा एकदा मनोरुग्णालयाच्या जागेवर स्थानक उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये विस्तारित स्थानक उभारण्यासंबंधी एक बैठक झाली. या बैठकीनंतर आयुक्त जयस्वाल यांनी तज्ज्ञ सल्लागारांमार्फत जागेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले. या सर्वेक्षणानंतर संबंधित सल्लागारांनी विस्तारित स्थानक उभारणीच्या जागेचा आराखडा तयार केला असून तो महापालिकेकडे सादर केला आहे. त्या आधारे प्रशासनाने स्थानकाच्या उभारणीसाठी आरक्षण बदलांचा प्रस्ताव येत्या २० एप्रिलला होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे.

[jwplayer KrLDSqeZ-1o30kmL6]

३४० मीटर लांबीच्या पट्टय़ात स्थानक

रेल्वेच्या मानकानुसार आणि परिचालनाच्या आवश्यकेनुसार दोन रेल्वे स्थानकांमधील अंतर किमान एक किमी असणे आवश्यक असते. ठाणे आणि मुलुंड स्थानकांमधील अंतर २.३४ किमी असून त्यापैकी दोन किमी जागा दोन्ही स्थानकांदरम्यान सोडावी लागणार आहे. उर्वरित ३४० मीटर जागेत विस्तारित स्थानक उभारावे लागणार आहे. ही जागा मनोरुग्णालयाच्या जागेमध्ये येते. तसेच विस्तारित स्थानक गरजेचे असल्याने त्यासाठी मनोरुग्णालयाची जागा योग्य असल्याचे तज्ज्ञ सल्लागारांनी अहवालात स्पष्ट केले आहे. तसेच रेल्वे स्थानक, फलाट, स्थानक इमारत, वाहनतळ, रस्ता आणि बस टर्मिनल अशा सुविधांकरिता सुधारित विकास आराखडा तयार करून दिला आहे. त्यामध्ये माध्यमिक शाळा व खेळाचे मैदानाची जागा बाधित होणार आहे. त्यामुळे या जागेच्या आरक्षण बदलाचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.

[jwplayer 2hVNZXIE-1o30kmL6]