नव्या वीज मीटर जोडणीसाठी ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो. महावितरणच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. हे हेलपाटे टाळण्यासाठी महावितरणने नवी वीज जोडणी मागणाऱ्या ग्राहकांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन ग्राहक ऑनलाइन पद्धतीने नव्या मीटरसाठी अर्ज करू शकतात. महावितरणचे मुख्य प्रभारी अभियंता देशपांडे यांनी ही माहिती नुकतीच ठाणे येथे आयोजित बैठकीमध्ये दिली.
पावसाळ्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्या अनुषंगाने महावितरणच्या वतीने करण्यात आलेली तयारी याचा आढवा घेण्याच्या उद्देशाने ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नुकतीच एक संयुक्त बैठक घेतली. त्या वेळी महावितरणकडून ऑनलाइन मीटर नोंदणी उपक्रमाची माहिती देण्यात आली. याचा फायदा नव्याने मीटर नोंदणी करणाऱ्यांना होऊ शकणार असून त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.
दिवा शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता तेथे स्वतंत्र वीज मंडळाचे कार्यालय उपलब्ध करून देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. या भागात शुक्रवारी तक्रार निवारण शिबीर भरवण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली. जास्त प्रमाणात बिल आलेल्या वीज ग्राहकांना त्यांच्या मीटरची योग्य तपासणी करून योग्य बिल देण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
पावसाळ्यातील कामाचा आढावा
ठाणे शहरातील जुन्या ट्रान्सफॉर्मरचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. शहरातील जुने ट्रान्फॉर्मर काढून नवीन ट्रान्सफॉर्मर लावावेत, अशी सूचना या वेळी अधिकाऱ्यांना करण्यात आली. पावसाळ्यात वीज मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या आपत्कालीन व्यवस्थेची माहिती या बैठकीत देण्यात आली. पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढत असल्या तरी वीज महामंडळाच्या कार्यालयात मात्र त्याची पुरेशी दखल घेतली जात नाही. मीटरच्या तपासणीसाठी विनंती करूनही कर्मचाऱ्यांकडून त्याची दखल घेतली जात नाही. अशा तक्रारी नागरिकांनी केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online form for new electricity meter
First published on: 12-06-2015 at 01:08 IST