डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रस्ते, पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिका अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून कारवाई सुरू केली. फेरीवाल्यांवरील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 डोंबिवली पश्चिमेतील फेरीवाला हटाव पथकातील १५ कामगार रेल्वे स्थानक परिसरातील गुप्ते रस्ता, दीनदयाळ, महात्मा फुले रस्ता, महात्मा गांधी रस्ता, विष्णुनगर परिसर फेरीवालामुक्त करतात. मग डोंबिवली पूर्व भागातील ग, फ प्रभागातील ३० कामगारांना ३०० फेरीवाल्यांना हटविण्यात कोणते अडथळे येतात, असे प्रश्न पादचारी करत होते. ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये ‘डोंबिवलीला फेरीवाल्यांचा वेढा’ या शीर्षकाखाली शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यामुळे ग प्रभागाचे पथक प्रमुख रमाकांत जोशी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील डॉ. रॉथ रस्ता, पाटकर रस्ता, रामनगर, राजाजी रस्ता भागात फेरीवाल्यांवर कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते. फेरीवाल्यांना रस्त्यावरून हटविण्याबरोबर त्यांचे सामान जप्त केले जात होते.

डोंबिवली रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर पूर्व भागात फेरीवाल्यांचे अडथळे सहन करत रिक्षा वाहनतळापर्यंत जावे लागते. सकाळ, सायंकाळ नोकरदार, पादचाऱ्यांना होणारा हा त्रास होऊ नये यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. फेरीवाल्यांवर दिखाव्यापुरती कारवाई करू नये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लता अरगडे, उपाध्यक्षा, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ