scorecardresearch

Premium

ठाणे : मेट्रो कामगाराच्या मृत्यूप्रकरणी सल्लागारासह कंत्राटदार कंपनीला दंड

कामगाराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची चौकशी केली जाणार असल्याचेही एमएमआरडीएने स्पष्ट केले.

Metro worker death Thane
ठाणे : मेट्रो कामगाराच्या मृत्यूप्रकरणी सल्लागारासह कंत्राटदार कंपनीला दंड (प्रातिनिधिक छायाचित्र)

ठाणे : तीन हात नाका येथील प्रादेशिक परिवहन कार्यालजवळ मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान बुधवारी एका कामगाराचा ७ मीटर उंचावरून खाली पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कंत्राटदाराला पाच लाख रुपयांचा दंड आणि सल्लागाराला एक लाख रुपयांचा दंड आकारला आहे. कामगाराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची चौकशी केली जाणार असल्याचेही एमएमआरडीएने स्पष्ट केले.

वडाळा-घाटकोपर-कासारवडली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू आहे. या मार्गिका तयार करण्यासाठी खासगी ठेकेदारांची आणि सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली. सुरक्षा साधने वापरून काम केले जात आहे का याची तपासणी सल्लागारांकडून केली जात असते. बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास धनंजय चौहान (३३) हा मजूर काम करत असताना सात मीटर उंचावरून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PM Narendra Modi
”नव्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलासाठी ८०० कोटी मंजूर”, मोदी म्हणाले, ”नवीन संसद भवनाप्रमाणे…”
bombay hc quashes fir against college student for rash driving that killed stray dog
वाहनाखाली चिरडून भटक्या श्वानाचा मृत्यू; आरोपी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम नको, न्यायालयाकडून गुन्हा रद्द
Nova Agritech IPO paid 10 times on day one
आयपीओ बाजारात उत्साह कायम; नोव्हा ॲग्रीटेकच्या ‘आयपीओ’साठी पहिल्याच दिवशी १० पट भरणा
charge of culpable homicide on dhavalsinh mohite
चोर समजून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, काँग्रेस जिल्हाध्यक्षांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

हेही वाचा – ठाण्यात भाजपला ‘जशास तसे’ उत्तर; शिंदे गटाचा निर्धार, भिवंडी मतदारसंघावर दावा करण्याची तयारी

हेही वाचा – मध्यरेल्वेच्या दिरंगाई कारभारामुळे प्रवासी हैराण

या प्रकरणाची एमएमआरडीएने गंभीर दखल घेतली आहे. ही घटना नेमकी कशी घडली याचा अहवाल तयार करण्याचे निर्देश एमएमआरडीएने दिले आहेत. तसेच तत्काळ दंडात्मक कारवाई म्हणून कंत्राटदाराला पाच लाख रुपये आणि सल्लागाराला एक लाख रुपये दंड आकारला आहे. काही महिन्यांपूर्वी कॅडबरी नाका येथे एका महिलेचा मेट्रो खांबाच्या उभारणीसाठी बसविण्यात आलेला पत्रा अंगावर पडून मृत्यू झाला होता. तर तीन हात नाका येथे मेट्रोच्या तुळईवरून लोखंडी सळई रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटारीमध्ये शिरली होती. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे नागरिकांकडून मेट्रोच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Penalty on contractor company along with consultant in metro worker death case incident in thane ssb

First published on: 08-12-2023 at 09:33 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×