ठाणे : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची रस्त्याकडेला उभी असलेली दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार कळवा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात मागील काही वर्षांपासून रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या वाहनांच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत.

हेही वाचा – डोंबिवलीत कोपरमध्ये भाजपच्या कमळ चिन्हाला शिवसैनिकांनी काळे फासले, दोन शिवसैनिकांवर गुन्हा

Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ

हेही वाचा – कोलशेत भागात वीज पुरवठा खंडीत झाल्याने रहिवाशांचे हाल

कळवा येथील पारसिक नगर परिसरात पोलीस अधिकारी राहातात. ते मुंबई पोलीस दलात साहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी राहत्या परिसरातील सार्वजनिक रस्त्याकडेला त्यांची दुचाकी उभी केली होती. त्यानंतर ते घरी निघून गेले. शनिवारी सकाळी ते दुचाकी धुण्यासाठी इमारतीखाली उतरले. त्यावेळी त्यांना रस्त्याकडेला उभी केलेली दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी वाहतूक नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. नियंत्रण कक्षाने देखील त्यांची दुचाकी कारवाई करून नेली नव्हती. आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.