कल्याण – येथील बारावे गावातील एका तरूणाने प्रभू रामचंद्रांवर तयार करण्यात आलेल्या गाण्यात छेडछाड करून त्यामध्ये दोन समाजात धार्मिक तेढ-तणाव निर्माण होईल असे शब्द टाकले. हे गाणे समाज माध्यमांवर प्रसारित करून स्वताच्या मोबाईलच्या कोनात स्थापित केले होते. याविषयी सोमवारी तक्रार दाखल होताच खडकपाडा पोलिसांनी संबंधित तरूणा विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ दुचाकी स्वारांवर दगडफेक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहनवाज मोहम्मद शब्बीर शेख उर्फ शानू शेख (३१) असे गुन्हा दाखल तरूणाचे नाव आहे. कल्याण पश्चिमेतील बारावे गावातील शिवपाडा येथील तो रहिवासी आहे. या प्रकरणी बारावे गावातील रहिवासी श्याम मिरकुटे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार श्याम मिरकुटे आणि त्यांचे मित्र गणेश सारंग, अनंत देशपांडे, आदेश जोशी गोदरेज पार्क भागात सार्वजनिक ठिकाणी उभे होते. त्यावेळी आदेश जोशी यांना त्यांच्या मोबाईलमध्ये दोन समाजात तणाव निर्माण होईल अशी दृश्यध्वनी चित्रफित अन्य एका इसमाने पाठविली होती. ही चित्रफित दोन समाजात तेढ निर्माण करणारी असल्याने मिरकुटे आणि त्यांच्या मित्रांनी ही माहिती तातडीने खडकपाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी केली. त्यावेळी धार्मिक भावना भडकतील असे गाणे त्या चित्रफितीमध्ये होते.