ठाणे महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे पोखरण १ व २ उच्चदाब वीज वाहिन्यांच्या टॉवरचे स्थलांतर करावे लागणार आहे. हे काम सोमवार २० ते बुधवार २४ जून या दरम्यान करण्यात येणार असून या काळात या वीज वाहिनीवरून होणारा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळात या वीज वाहिनीवरील वीजपुरवठा बंद राहणार आहे.

या वीज बंदमुळे कोरम मॉल, देव कॉर्पोरेशन, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, वोल्टास, ज्युपिटर हॉस्पिटल, एक्स.एल.ओ. मशीन्स, जेके केमिकल्स, सिंघानिया स्कूल, रेमंड, कॅडबरी, ब्लू स्टार, ग्लॅक्सो कंपनी या भागातील वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. या वाहिनीवरील सर्व उच्च दाब ग्राहकांनी महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंत्यांनी केले आहे.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.