भावनाविवश होऊन नव्हे, तर हळव्या भावनांना थांबवून रेडीओ जॉकी कार्यक्रम सादर करावा लागतो, असे मत रेडीओ जॉकी गणेश आचवल यांनी व्यक्त केले.
आचवल तसेच त्यांचे सहकारी मित्र रेडीओ जॉकी रश्मी वारंग व मयुरेश शिर्के यांनी ‘मनस्पर्शी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून बदलापूरात रसिकांशी संवाद साधला.
येथील ‘सुहृद संस्थे’ने जागतिक महिला दिन आणि प्रथम वर्धापनदिनानिमित्त काटदरे मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. या वेळी ‘ग्रंथसखा’चे श्याम जोशी, काका गोळे फाऊंडेशनचे आशिष गोळे आदी मान्यवर उपस्थित होते. रश्मी वारंग  म्हणाल्या की, रसिकांना बोजड वाटणारा विषय हलका करून सांगणे यात खरे कौशल्य पणाला लागते.  
निवेदनात उत्स्फूर्तता, अचूकता लागते, असे मयुरेश शिर्के म्हणाले.